कै शंकरराव घाटगे शिक्षणप्रसारक मंडळाचा प्रा जयसिंगराव सावंत याना जीवनगौरव पुरस्कार जाहीर*

Spread the news

*कै शंकरराव घाटगे शिक्षणप्रसारक मंडळाचा प्रा जयसिंगराव सावंत याना जीवनगौरव पुरस्कार जाहीर*
कोल्हापूर दि.-कै.शंकराव घाटगे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सौ. वृंदा घाटगे प्री-प्रायमरी स्कूल येथे *वार्षिक स्नेहसंमेलन व गौरव सोहळा* येत्या 30/1/2026 रोजी डॉ.व्ही. टी. पाटील सांस्कृतिक भवन राजारामपुरी कोल्हापूर येथे दुपारी ठीक २.३० वाजता येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे *प्रा.जयसिंगराव सावंत* यांना जीवनगौरव पुरस्कार,*स्व.नानासाहेब जरग यांना मरणोत्तर स्मृतिचिन्ह ,प्रशांत जरग ,श्रीमती विमल गवळी. गोविंद कुलकर्णी गुरुजी, आय जी फुटाणे सर, एस एम बागेवाडी सर, तसेच नवनिर्वाचित नगरसेविका डॉ, सुषमा संतोष जरग* यांचा सन्मान केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून *संत साहित्यिक व नामवंत वक्ते प्रा. शिवाजीराव भुकेले* उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते सन्मान प्रदान करण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे *संस्कारसोहळा* हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असून चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे दर्शन घडणार आहे. नृत्य, गीत, नाट्य व संस्कारमूल्यांवर आधारित सादरीकरणे हे या स्नेहसंमेलनाचे खास आकर्षण असणार आहे.
यावेळी संस्थेचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पालकांच्या सहकार्याने या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या सोहळ्यास नीता ठोंबरे, बेळगावचे उद्योगपती कलगोंडा पाटील, रावसाहेब मुरगी, बाजीराव माणगावे, शिवाजी पाटील, सागर पाटील उपस्थित राहणार आहेत. पालक, माजी विद्यार्थी, शिक्षणप्रेमी नागरिक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे के. शंकरराव घाटगे शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने पी.एस.घाटगे व सौ वृंदा घाटगे यांनी आव्हान केले आहे आहे.

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!