“मानवतेच्या समस्यांवर उपाय हीच खरी नवकल्पना” — डॉ. सुष्मा कुलकर्णी
एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयात एनसीआयईटी-२०२६ परिषदेचा उद्घाटन सोहळा पार पडला.
मुख्य अतिथी, माजी कुलगुरू निकमार विद्यापीठ, पुणे येथील डॉ. सुष्मा कुलकर्णी यांनी “नवीन तंत्रज्ञान म्हणजेच
नवकल्पना नव्हे, तर मानवतेसमोरील मोठ्या समस्यांचे समाधान शोधणे हीच खरी नवकल्पना आहे,” असा
प्रेरणादायी संदेश व्यक्त केला. कार्यक्रमाला श्री. एस. पी. शिंदे, डॉ. डी. एस. बोरमणे, डॉ. आर. आर. इटकरकर ,
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची उपस्थिती होती. राजस्थान, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू
आणि महाराष्ट्रातील विविध शहरांतून आलेल्या १४५ संशोधन पेपरपैकी ८५ पेपर या परिषदेत सादर होणार असून,
इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, एआय, मेकॅनिकल व सिव्हिल अशा विविध क्षेत्रांतील पेपर सादर होत असल्याची माहिती
निमंत्रक, एनसीआयईटी-२०२६ च्या डॉ. सौ. आर. आर. इटकरकर यांनी दिली.
या परिषदेसाठी एआयएसएसएम संस्थेचे सचिव श्रीमंत छत्रपती मालोजीराजे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
विद्यार्थ्यांनी बहुविद्याशाखीय पद्धतीने एकत्र येऊन समाजातील वास्तव समस्यांवर उपाय शोधण्याची गरज
असल्याचे मत श्री. एस. पी. शिंदे यांनी व्यक्त केले. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रातील नवीन संशोधकांना व्यासपीठ
उपलब्ध करून देणे हे परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे डॉ. डी. एस. बोरमणे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन कु. मनस्वी हिने केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल श्री. अजय पाटील (खजिनदार, एआयएसएसएम संस्था), ॲड. भगवानराव
साळुंखे (अध्यक्ष, व्यवस्थापकीय समिती, एआयएसएसएम संस्था) तसेच संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी आयोजन
समितीचे अभिनंदन करून भविष्यात अशा उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.




