कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होईल

Spread the news

कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होईल

­

 

जास्त सदस्य संख्येमुळे राष्ट्रवादीचा दावा

  •  

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण

कोल्हापूर, दि. १२:
कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होईल. कोल्हापूर महानगरपालिकेतील फाॅर्म्युल्याप्रमाणे ज्या पक्षाची सदस्यसंख्या जास्त, त्या पक्षाचा अध्यक्ष हे धोरण राबवावे, अशी अपेक्षा मंत्री श्री. मुश्रीफ यांनी व्यक्त केली. दरम्यान; जास्त संख्येमुळे कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदावर राष्ट्रवादीचा दावा आहे, असे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

श्री. मुश्रीफ जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह सर्वच बँकांना बँकिंग रेग्युलेटरी ॲक्ट लागू आहे. या ॲक्टमधील दहा वर्षाच्या नियमामुळे मी बँकेची निवडणूक लढवणार नसून गोकुळ दूध संघाची निवडणूक लढविणार असल्याच्या अफवा काही शक्ती जाणीवपूर्वक पेरीत आहेत. परंतू; मी गोकुळ दूध संघाची निवडणूक लढविणार नाही. दरम्यान; बँकेच्या सलग दहा वर्षे संचालक पदाचा जो नियम आहे, तो हा निर्णय झाल्यापासून करावा की पूर्वलक्षी प्रभावाने करावा, याबाबत मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केंद्रीय सहकार मंत्री व केंद्रीय गृहमंत्री नामदार अमितभाई शहा यांना भेटणार आहोत. गेली ४०-४५ वर्षे के. डी. सी. सी. बँकेत कार्यरत असल्यामुळे बँकेच्या सत्तेतून पायउतार होण्याची इच्छा मी यापूर्वीही अनेकदा जाहीररित्या व्यक्त केलेली आहे.

ही तर अफवांची फॅक्टरी……!
श्री. मुश्रीफ यांनी म्ह॔टले आहे, आज पर्यंतच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत मी ज्या ठिकाणी राहतो आणि जी भूमिका मांडतो त्या भूमिकेची प्रामाणिकपणे थांबत राहतो. ज्यावेळी मतभेद होतील त्यावेळी हातचा राखून न ठेवता विरोधही तितक्याच प्रामाणिकपणे करतो, हा इतिहास आहे. केडीसीसी बँक सोडून मी गोकुळ दूध संघाची निवडणूक लढविणार आणि आणि जिल्हा परिषदेमध्ये आमदार सतीश पाटील आणि काँग्रेसची हात मिळवणी करणार, ही तर निव्वळ अफवांचीच फॅक्टरी आहे. हा तर काही शक्तींचा राजकीय विद्वेशातून विनाकारण गैरसमज पसरवून बदनामी करण्याचा जाणीवपूर्वक डाव आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!