कोल्हापुरात तेजस- स्नेहा पाटील विवाह सोहळा थाटात

Spread the news

कोल्हापुरात तेजस- स्नेहा पाटील
विवाह सोहळा थाटात

­

 

कोल्हापूर : ढोल-ताशांचा गजर, आकर्षक फुलांची सजावट, मनमोहक कारंज्यासह पारंपरिक विधी आणि मंगलाष्टकांच्या गजरात माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय पाटील व शांतादेवी डी. पाटील यांचे नातू, डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांचे पुतणे आणि माजी गृहराज्यमंत्री व विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज डी. पाटील व प्रतिमा पाटील यांचे सुपुत्र चि. तेजस आणि सुहासराव आनंदराव पाटील व वनश्री पाटील यांची कन्या चि. सौ. कां. स्नेहा यांचा विवाह सोहळा मंगळवारी सायंकाळी पोलीस ग्राउंड येथे शाही थाटात संपन्न झाला. या सोहळ्याला खासदार शाहू महाराज छत्रपती, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, पुढारीचे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, माजी आमदार श्री. बाबासाहेब पाटील-सरूडकर,
माजी मंत्री आमदार जयंत पाटील, माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

  •  

नवदांपत्यास शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, साहित्य अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये महापौर रूपाराणी निकम,जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.शिल्पा खोत, ,पुढारीचे समूह संपादक डॉ. योगेश जाधव, आमदार सर्वश्री अतुल भोसले प्रा. जयंत आसगावकर, विनय कोरे, राहुल आवाडे, राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार जयवंतराव आवळे, प्रा. संजय मंडलिक, राजू शेट्टी, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती,उल्हासदादा पवार, शिवाजीराव नाईक,बजरंग देसाई, के पी पाटील, सत्यजित पाटील सरूडकर, प्रकाश आवाडे, संजय घाटगे, जयश्री जाधव,राजीव आवळे, डॉ. सुजित मिणचेकर, सुरेश हाळवणकर, राजूबाबा आवळे, राजेश पाटील,भरमु पाटील,वीरकुमार पाटील,वैभव नाईक, वैजनाथ शिंदे, दिलीप माने, गोकुळचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ, समरजित घाटगे, मानसिंगराव गायकवाड,राजेश पी पाटील,राहुल पी पाटील,गणपतराव पाटील,व्ही बी पाटील,शिवसेनेचे संजय पवार, याज्ञसेनिराजे छत्रपती, संयोगीताराजे छत्रपती,मधुरीमाराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती, गीतादेवी जाधव,सरोज पाटील माई, प्रशांत जगताप, आनंदनाथ सांगवडेकर, उद्योजक संजय घोडावत,सतीश मगर, बाळ पाटणकर, प्रविणसिंह घाटगे,डॉ वेदप्रकाश मिश्रा, डॉ बी पी साबळे, डॉ भारत पाटणकर, उपमहापौर अक्षय जरग, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर,सचिन चव्हाण,गटनेता इंद्रजीत बोंद्रे,जि.प.गटनेता एकनाथ पाटील यांच्यासह गोकुळ दूध संघाचे आजी माजी संचालक,आजी माजी नगरसेवक – नगरसेविका,जि.प.,पं. स.,सरपंच,ग्रा. पं. सदस्य,विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारी,डी वाय पाटील समूहातील विविध संस्थांचे कुलगुरू,प्राचार्य,पदाधिकारी आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील आणि सौ. शांतदेवी डी. पाटील यांनी वधू वरांना शुभाशीर्वाद दिले.मान्यवरांचे स्वागत डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील,आमदार सतेज डी. पाटील, डॉ. विजय डी पाटील, डॉ.अजिंक्य डी पाटील,श्री.सुहासराव आनंदराव पाटील,डॉ. श्री. उद्धव पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील,सौ. वैजयंती संजय पाटील, सौ. प्रतिमा सतेज पाटील, सौ. वनश्री सुहासराव पाटील, सौ. पूजा ऋतुराज पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, कु. देवश्री सतेज पाटील, राजेश खडके,श्री देवराज पाटील, निशांत पाटील, सुशांत पाटील, अर्जुन पाटील, आर्यमन पाटील यांनी केले.

यावेळी डॉ. पी.डी.पाटील, डॉ. भाग्यश्री पी. पाटील, प्रतापराव चव्हाण पाटील, सौ. सुप्रिया प्रतापराव चव्हाण पाटील, मेघराज काकडे,सौ. राजश्रीताई काकडे, डॉ. विजय डी पाटील,सौ. शिवानी विजय पाटील, डॉ.अजिंक्य डी पाटील,सौ. पूजा अजिंक्य पाटील ,डॉ. प्रदीप पालशेतकर, डॉ. नंदिता पालशेतकर,डॉ प्रिया चोलेरा, रश्मिन चोलेरा,श्री. अनिल मोरे,श्री. अजय आवटे, सौ. स्मितादेवी योगेश जाधव,सोमनाथ पाटील,भरत चव्हाण पाटील, करण काकडे यांच्यासह कुटूंबीय उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!