शिक्षकांनी ज्ञानग्रहण करण्यात कमीपणा मानू नये : शिक्षण उपसंचालक संचालक प्रभावती कोळेकर

Spread the news

शिक्षकांनी ज्ञानग्रहण करण्यात कमीपणा मानू नये : शिक्षण उपसंचालक संचालक प्रभावती कोळेकर
कोल्हापूर : शिक्षक सुद्धा आयुष्यभर विद्यार्थीच असतो त्यामुळे शिक्षकांनी ज्ञानग्रहण करण्यात कमीपणा मानू नये असे प्रतिपादन कोल्हापूर विभागाच्या शिक्षण उप संचालक प्रभावती कोळेकर यांनी केले . त्या खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती व महावीर महाविद्यालय चा बी .ए बी .एड विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित TET परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत बोलत होत्या .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे हे होते . तर मान्यवर पाहुणे म्हणून महावीर कॉलेज बी . ए .बी . एड विभाग प्रमुख डॉ.महादेव शिंदे व दादासाहेब मगदूम हायस्कूलचे मुख्याध्यापक बसवराज वस्त्रद हे होते .
खाजगी प्राथमिक शाळातील शिक्षकांना राज्य शासनामार्फत जून महिन्यात घेतल्या जाणाऱ्या TET परीक्षेसाठी योग्य ते मार्गदर्शन व दिशा मिळावी यासाठी दि 10 एप्रिल ते 12 एप्रिल 2026 या तीन दिवसा साठी ही कार्यशाळाआयोजित केलेली आहे . या कार्यशाळेला शहरासह परिसरातील खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला .या कार्यशाळे मध्ये पुणे व सातारा जिल्ह्यातील रविंद्र लेंभे ,सुशांत भंडारे , सतीश कांबळे, राहूल धुमाळ, सुरेशचंद्र मेस्त्री हे तज्ञ शिक्षक गणित मराठी इंग्रजी मानसशास्त्र समाजशास्त्र व विज्ञान या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत .
यावेळी शिक्षकांना संबोधित करताना प्रभावती कोळेकर म्हणाल्या की विद्यार्थ्यांना अध्यापन करणारा शिक्षक हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो त्यामुळे कोणत्याही वयात अध्ययन करताना व ज्ञानग्रहण करताना शिक्षकानी कमीपणा मानू नये . उलट आपली ज्ञानाची खोली वाढवण्यासाठी हे मला मिळालेले संचित आहे असा भाव घेऊन या कार्य शाळेचा लाभ घ्यावा म्हणजे आज उपस्थित असणारे शिक्षक शंभर टक्के TET परीक्षा उत्तीर्ण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .
अध्यक्षपदावरून बोलताना भरत रसाळे म्हणाले की , केरळ मधील खासदार जॉन ब्रुटस यांनी संसदेमध्ये आरईटी 20O9 मध्ये संशोधन करणारे एक खाजगी विधेयक सादर केलेले आहे .पण हे संशोधन विध्येयक राज्यसभेच्या पटलावर
आलेलेच नाही व त्यामुळे 2009 पूर्वीच्या शिक्षकांना TET करण्यास दिलासा मिळणार अशा फसव्या बातम्यावर विश्वास न ठेवता मी येणारी TET परीक्षा उत्तीर्ण होणारच असा निर्धार करूनच आपण या कार्यशाळेचा लाभ घ्यावा . असे आवाहन केले .या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक खाजगी जिल्हाध्यक्ष कुमार पाटील यांनी केले तर आभार महिला जिल्हाध्यक्षा सविता गिरी यांनी मांडले . ही कार्यशाळा सर्वोत्तम होण्यासाठी महावीर कॉलेजने आपला इंटरऑक्टिव्ह बोर्डसह सुसज्ज असलेला हॉल उपलब्ध करून दिला . या उद्घाटन सोहळ्यासाठी संघटनेचे राज्यसचिव शिवाजी भोसले विभागीय अध्यक्ष महादेव डावरे शहराध्यक्ष आप्पासाहेब वागरे , चारुलता पाटील ,संघटक पी .डी आवळे प्रवीण पाटील ,पतसंस्थेचे संचालक शिवाजी सोनाळकर वर्षाराणी वायदंडे ,रोहिणी येडगे चंद्रकांत वाकरेकर, गोरख वातकर ‘सचिन शेवडे ,विद्या पाटील ,छाया हिरुगडे , माणिक सपाटे यांच्यासह शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .
. …..

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!