साहित्यिकांनी मानवतावादी भूमिका घेत देशहितासाठी आपल्या लेखणीतून स्वप्न पेरावी

Spread the news

साहित्यिकांनी मानवतावादी भूमिका घेत देशहितासाठी आपल्या लेखणीतून स्वप्न पेरावी : मा. आमदार ऋतुराज पाटील
पहिल्या सतेज कार्य गौरव पुरस्काराने भूपाल शेटे सन्मानित

­

 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मानवी समाजामध्ये कवी, लेखक, साहित्यिक आणि कलावंताना मनाचे स्थान असते. आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी सत्याची बाजू घेतली पाहिजे. भारतीय साहित्यिकांचा इतिहास क्रांतिकारी आहे. अनेक साहित्यिकांनी देश आणि मानवी हिताच्या भूमिका घेतल्या आहेत. भारतातील सध्याची परिस्थिती भयावह आहे. मानवी समाजासमोर जगण्या मरण्याचे अनेक प्रश्न आवासून उभे आहेत. राजकारणातील नीतिमत्तेचा दर्जा घसरला आहे. सामान्य माणूस बेहाल झाला असून साहित्यिकांनी मानवतावादी भूमिका घेत समाज आणि देशहितासाठी आपल्या लेखणीतून स्वप्न पेरावी असे प्रतिपादन मा. आमदार ऋतुराज पाटील यांनी केले.
ते महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते महाराष्ट्र राज्याचे मा. गृह राज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे मा. पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त
सतेज काव्य मंचच्या वतीने आयोजित राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी कवी डॉ. वसंत भागवत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या भव्य सतेज काव्य संमेलनात बोलत होते.
यावेळी कोल्हापूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व सर्वसामान्य कष्टकरी जनतेचे नेते, कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर भूपाल शेटे यांना या वर्षीचा मानाचा, सन्मानाचा आणि स्वाभिमानाचा पहिला सतेज कार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रोख पाच हजार रुपये, पंचवीस हजारांची पुस्तके आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
तत्पूर्वी भव्य सतेज काव्य संमेलनाचे उद्घाटक मिलिंद यादव यांच्या हस्ते ‘नव्या विचारांच्या नव्या कविता’ या अनिल म्हमाने, डॉ. वसंत भागवत, डॉ. मिनल राजहंस संपादित कवितासंग्रहाचे प्रकाशन आणि एक नास्तिक जेव्हा सर्वसामान्यांच्या गर्दीतून, चार तास धक्का-बुक्कीचा, चेंगरा-चेंगरीचा अनुभव घेत रात्री आठ वाजता तिरुमल्लाच्या गाभाऱ्यात जाऊन देवासमोर उभा राहिला, तेव्हा तिरुमल्ला म्हणाला, काय नडलं होतं? एवढ्या गर्दीतून यायचं? आणखी चार तास थांबला असतास, तर
येणारच होतो की मीही बाहेर, हवा खायला, फार गुदमरायला होतं रे इथं या कवितेच्या सादरीकरणाने उद्घाटन केले.
यावेळी सतेज काव्य संमेलन पुढे जोमाने चालू रहावे यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी एक लाख रुपये, अनिल म्हमाने, सुरेश केसरकर यांनी प्रत्येकी पन्नास हजार रुपये, भूपाल शेटे, संदीप गुरव यांनी प्रत्येकी पंचवीस हजार रुपये असे एकूण अडीच लाख रुपये देणगी दिली.
यावेळी प्रकाशक व दिग्दर्शक अनिल म्हमाने म्हणाले, सजग कवींनी मानवमुक्तीचा हुंकार बनले पाहिजे. वास्तववादी मानवकेंद्री विषयावर भाष्य करणाऱ्या कविता निर्माण झाल्या पाहिजेत. व्यक्त होण्यासाठी शब्दावर जितकी बंधन घातली जातील तितक्याच तीव्रतेने क्रांतिकारी कविता निर्माण होतील.
यावेळी आमदार ऋतुराज पाटील, बालसाहित्य कलामंचचा राज्याध्यक्ष आदित्य म्हमाने, मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या प्रमुख अंतिमा कोल्हापूरकर, ज्येष्ठ कामगार नेते सुरेश केसरकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कवी डॉ. कपिल राजहंस यांनी शब्दांच्या टाळूवरचं लोणी ओरबडणाऱ्या या काळात, मी आज इथे उभा आहे, हातात लेखणी घेऊन नव्हे, तर काळजाचा तुकडा घेऊन! आम्ही लिहित राहू, तेव्हापर्यंत, जोपर्यंत शेवटचा माणूस ताठ कण्याने उभा राहत नाही, आमचा जाहीरनामा स्पष्ट आहे, तुमचा तुरुंग लहान पडेल, इतकी मोठी आमची स्वप्नं आहेत! ही कविता सादर केली.
भूपाल शेटे पुरस्काराला उत्तर देताना म्हणाले, या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली असून मी माझे पुढील आयुष्य जनतेच्या सेवेसाठीच व्यतीत करेन. या पुरस्काराने मला काम करण्याची नवी उमेद मिळाली आहे.
यावेळी संतोष सुर्यवंशी, शंकर पुजारी, अ‍ॅड. मारुती व्हनखंडे, जितेंद्र चोकाककर, प्रा. सारिका उजगरे, अशोक माळवी, निहाल कोरे, मारुती बेलभंडारे, प्रा. संदीपभाऊ वानखेडे, आरती गायकवाड, राहुल पवार, डॉ. प्रियंका खंडाळे, डॉ. मल्हारी पिंगळे, अ‍ॅड. कल्पना लोहारे, भिमराव कांबळे, डॉ. शिवाजी कांबळे, मच्छिंद्र बिडगर, जी. एल. तिरपुडे, मिनल कोंबळे, प्रमोद साठे, डॉ. वंदना लोंढे, महेंद्र रंगारी, डॉ. आनंद हाबळे यांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्रातील विविध भागातून सहभागी झालेल्या डॉ. कपिल राजहंस, रमेश नाईक, बाबुराव कांबळे, उमेश शिरगुप्पे, प्रा. संजय कांबळे, प्रा. सचिन बेलेकर, राजकुमार किर्दत, दत्तात्रय पाटील, रवींद्र फडणीस, युवराज पाटील, परशुराम कांबळे, अंकिता कांबळे, डॉ. दत्ता ठुबे, स्वाती कोरगावकर, जान्हवी कांबळे, वसुंधरा निकम, शिवाजी पाटील, प्राचार्या शालिनी पवार, सोमनाथ दळवी, सुनील गोडबोले, किरण पाटील, राजश्री दळवी, सागर सोनवणे, रघुनाथ कापसे, सुवर्णा शहा, प्रताप घेवडे, दीप्ती कुलकर्णी, विजयकुमार पोवार, राहुल राजापुरे, विनायक कुलकर्णी, नितीन पवार, सुरेश कुलकर्णी, नामदेव हुले, सुरेश पुनाळकर, दादासाहेब सादोळकर, कवी श्रीलता, प्रमिला कुलकर्णी, निशा खरात, डॉ. जगन्नाथ कांबळे, किरण मेस्त्री, डॉ. मिलिंदराज कांबळे, रमेश मोटे, श्रद्धा सूर्यवंशी, विनायक यादव, शरद गुरव, रवींद्र भोसले, भार्गवी कुलकर्णी, सुचित्रा पवार, दिनकर साळोखे, दिलीप नेवसे, जान्हवी सावंत, रोहिणी पराडकर, कल्याण श्रावस्ती, अपूर्वा पाटील, उर्मिला तेली, सुवर्णा वाघमारे, अनिल कलकुटकी, धोंडीलाल नूर मोहम्मद मुजावर, प्रकाश पोतदार, विलास साठे, मंगेश रावळ, वेदा माळकर, सुवर्णा पवार, अपर्णा पाटील, वैभव ढोबळे, दिलीप पाटील, अर्जुन जाधव, आरती मांढरे, जयश्री जगताप, सलीम शेख, मेघा शहा, स्मिता चोथे, सुस्मिता रेंदाळकर, रावसाहेब पाटील, भूपाल कांबळे, लक्ष्मण शिंदे, मायकल जॉन डिसोजा, सरस्वती डवरी, गणेश गायकवाड, योगिता कोठेकर, सुनिल जाधव, रामचंद्र कांबळे, संजय पाटील, महंमद नाईकवाडे, विठ्ठल जावळे, जगन्नाथ मोरे, बाबासाहेब कांबळे, सुहासीनी शेळके, नंदिनी चांदवले, माधवी पोवार, श्याम कारंजकर, संजय माळी, संजय माने, वर्षा ढाले या कवींसह जवळपास 250 हून अधिक कवींनी आपल्या विविध विषयांवरील कवितांचे सादरीकरण केले.
सचिन खराडे, मदन पवार, अनिता काळे, भगवान माने, संभाजी थोरात, संजय सासने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक सुरेश केसरकर यांनी तर सूत्रसंचालन अभिजीत मासुर्लीकर यांनी केले. आभार अंतिमा कोल्हापूरकर यांनी मानले.

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!