लव्ह जिहादविरोधात कडक कायद्यांसाठी विश्व हिंदू परिषदेची तीव्र निदर्शने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Spread the news

लव्ह जिहादविरोधात कडक कायद्यांसाठी विश्व हिंदू परिषदेची तीव्र निदर्शने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
कोल्हापूर : लव्ह जिहादविरोधात कठोर कायदे करून त्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी, या ठाम मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल वतीने राष्ट्रीय आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आक्रमक घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आणि मागण्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी गुरव यांना सादर करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष शांतीभाई लिंबाई – जिल्हा मंत्री विनयजी बारड यांनी केले . यावेळी सह मंत्री रावसाहेब पाटील, उपाध्यक्ष कृष्णात गुंडूकुपे, जान्हवी पाटील, निलेश शिंदे, सागर माथे मुकेश dayama तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते संभाजी साळुंखे, डॉ. अश्विनी माळकर, शिवानंद स्वामी गजानग तोडकर आदींसह बजरंग दल दुर्गा वहिनी च्या पदाधिकारी सहभाग झाले होते .
देशभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर 17 एप्रिल रोजी एकाच वेळी निवेदने देण्यात आली असून, या विषयावर राष्ट्रीय पातळीवर दबाव वाढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी बोलताना जिल्हामंत्री विनय बारड यांनी सांगितले की, “कोल्हापूरच्या ग्रामीण भागात अशा घटनांचे वाढते प्रमाण चिंताजनक असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करणे गरजेचे आहे.”
जिल्हाध्यक्ष शांतीभाई लिंबाणी यांनीही राज्य आणि देशभरात हा प्रकार संघटित स्वरूपात वाढत असल्याचा आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली.
जानवी पाटील आणि डॉ. अश्विनी माळकर यांनी “लव्ह जिहादचे षडयंत्र नियोजनबद्ध पद्धतीने राबवले जात असून त्याची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी कठोर कायदे आवश्यक आहेत,” असे ठामपणे नमूद केले. आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!