Spread the news

शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखा वगळून जनगणना प्रशिक्षण आयोजित करावे : भरत रसाळे राज्याचे प्रधान जनगणना अधिकारी यांच्याकडे केली मागणी
कोल्हापूर .जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्यातील प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण दि . .26 एप्रिल रोजी होणाऱ्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखा वगळून देण्यात यावे अशी मागणी राज्याचे मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डॉ . निरुपमा डांगे (भाप्रसे ) यांचे कडे केलेची माहिती महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी दिली आहे .
भरत रसाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलेले आहे की , भारतीय जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्यासाठी पर्यवेक्षक व प्रगणक म्हणून शिक्षकांना दि . 23 एप्रिल ते 8 मे 2026 च्या दरम्यान चार-पाच बॅचेस करून प्रशिक्षण दिले जाणार आहे .दरम्यानच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाची इयत्ता चौथी व सातवी साठीची शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा दिन .26 एप्रिल 2026 रोजी होत आहे व ही परीक्षेसाठी पर्यवेक्षक केंद्र प्रमुख म्हणून कर्तव्य पार पाडण्यासाठी हजारो शिक्षक लागणार आहेत .त्यामुळे सदर कालावधीत जनगणना प्रशिक्षण ठेवल्यास या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेचे नियोजन करणे अडचणीचे होणार आहे म्हणून आम्ही आपल्याकडे मागणी करतो की जनगणना 2027 ची कामगिरी एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पार पाडण्यास आम्ही सगळे शिक्षक तयार आहोत . परंतु पहिल्या टप्प्यातील जनगणनेच्या प्रगणक व पर्यवेक्षक यांचा कालावधी निश्चित करताना शासकीय शिष्यवृती परीक्षेच्या वगळून या प्रशिक्षणाचे नियोजन करावे .
अशाच पद्धतीचे निवेदन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे कडे केली असून त्यांनीही राज्य म प्रधान जनगणना अधिकारी यांचेकड पत्र पाठवून शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखा वगळून जनगणना प्रशिक्षणाचे आयोजन करण्याची मागणी करावी अशा प्रकारचे निवेदन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला आहे दिले असल्याची माहिती राज्याध्यक्ष भारत रसाळे यांनी दिलेले आहे . ..

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!