पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’जनसंवादास कागल-गडहिंग्लज-उत्तूर मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the news

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’जनसंवादास कागल-गडहिंग्लज-उत्तूर मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद

­

 

शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत विविध ठिकाणी आयोजन

  •  

गडहिंग्लज प्रतिनिधी :
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी साधलेल्या संवादाला कागल-गडहिंग्लज-उत्तूर विधानसभा मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मतदारसंघातील विविध शहरांसह ग्रामीण भागात भाजप पदाधिकारी,लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकत्रितपणे हा कार्यक्रम पाहत पंतप्रधानांच्या विचारांना दाद दिली.
गडहिंग्लज येथे आयोजित कार्यक्रमास शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे,जिल्हा सरचिटणीस राजेंद्र तारळे,राजे बँकेचे उपाध्यक्ष रविंद्र घोरपडे,माजी उपनगराध्यक्ष सुनिल गुरव,संजय बटकडली,गणपतराव डोंगरे,शहराध्यक्ष संदीप कुरळे,नगरसेविका अनिता खोत,सचिन घुगरी,अर्चना रिंगणे,निलांबरी भुईंबर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रमुख उपस्थित होते.
कागल येथे दूधगंगा डेअरीमध्ये झालेल्या कार्यक्रमास अखिलेशराजे घाटगे, शाहूचे संचालक सतीश पाटील, शहराध्यक्ष यशवंत माने यांच्यासह नगरसेवक तसेच नागरिक उपस्थित होते. सिद्धनेर्ली येथे वीरेंद्रसिंहराजे घाटगे ,पंचायत समिती सभापती सुवर्णा पाटील, शाहू कृषीचे चेअरमन रामचंद्र वैराट, राजे बँकेचे संचालक राघू हजारे, शाहू कृषी संचालक रमेश कांबळे यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते.सेनापती कापशी येथे शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, पंचायत समिती सदस्या सुनिता माळी,राजे बँकेचे संचालक प्रकाश पाटील,तुकाराम भारमल, मिलींद देशपांडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.आणूर येथे जिल्हा परिषद सदस्य काकासाहेब सावडकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुरगूड येथे दिग्विजयसिंह पाटील,राजे बँकेचे संचालक दत्तामामा खराडे,अनंत फर्नांडिस,विलास गुरव यांच्यासह नागरिकांनी सहभाग घेतला. बिद्री येथे संभाजी फराकटे, राजे बँकेचे संचालक संजय पाटील, संदेश पाटील बाळासो वारके, एम.एम.चौगुले आदी उपस्थित होते,आणुरमध्ये जिल्हा परिषद सदस्य काकासाहेब सावडकर,पंचायत समिती सदस्य दत्तात्रय दंडवते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.नानीबाई चिखली,उत्तूर,भादवण येथेही या कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला.
मतदारसंघातील शहरी व ग्रामीण भागात एकाच वेळी उमटलेल्या या प्रतिसादातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील विश्वास अधोरेखित झाला. ‘मन की बात’ कार्यक्रमातून मांडण्यात आलेले राष्ट्रहित, समाजप्रबोधन आणि विकासाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले. कार्यक्रमानंतर अनेक ठिकाणी उपस्थितांनी देशाच्या प्रगतीसाठी सामूहिक सहभागाची भावना व्यक्त केली.

छायाचित्र गडहिंग्लज येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’जनसंवाद कार्यक्रमवेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे, राजेंद्र तारळे, रविंद्र घोरपडे,माजी उपनगराध्यक्ष सुनिल गुरव व इतर मान्यवर


Spread the news

You may also like

error: Content is protected !!