मंत्री हसन मुश्रीफ यांचा इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांशी संवाद….

Spread the news

मंत्री हसन मुश्रीफ यांचा इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांशी संवाद….

­

 

  •  

□ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीला मी उपस्थित होतो. या बैठकीला पक्षाच्या सर्व नेतेमंडळींसह सर्व खासदार व आमदारही उपस्थित होते. या बैठकीत आम्ही सर्वांनी उपमुख्यमंत्री नामदार सुनेत्रावहिनी पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय आम्ही एकमताने घेतलेला आहे. राष्ट्रवादी पक्षातील हे पेल्यातील वादळ पेल्यामध्येच संपलेले आहे. प्रफुल पटेल हे काही कामानिमित्त बैठकीला अनुपस्थित होते, असे स्पष्टीकरणही श्री. मुश्रीफ यांनी दिले.

□ स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनानंतर आपण व प्रफुल पटेल यांच्या बाबतीत जे घडलं त्याबाबत नाराज आहे. पक्षाचा कोणीही नेता आमच्या समर्थनार्थ आला नाही, असे नाराजीचे वक्तव्य श्री. तटकरे यांनी केल्याकडे लक्ष वेधले असता मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांच्या शपथविधीनंतर प्रसार माध्यमांमध्ये त्यांना व्हिलन ठरवण्यात आल्याबद्दल त्यांनी अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या होत्या. आपल्याला टार्गेट केल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली होती. परंतु; संपूर्ण पक्ष एकसंघच आहे.

□ अर्थ खाते हे आमच्या पक्षाकडे होते. अद्याप ते मिळालेले नाही. ते नंतर देतो असे सांगितले होते. याबाबतचा निर्णय लवकरच होईल.

□ २०२९ ची निवडणूक राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्याच्या श्री. छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता श्री. मुश्रीफ म्हणाले, ज्या- ज्यावेळेला निवडणुका येतात त्या- त्यावेळी सगळेच पक्ष अशा प्रकारची तयारी करीत असतात. निवडणुका या महायुती म्हणून एकत्रितच लढल्या जातील.

□ गोकुळ दूध संघाच्या उमेदवारीसाठी सव्वाशे ते दीडशे ठरावांची जुळणी हवी, या विषयावरून ठिणगी पडली काय? असे विचारल्यावर श्री. मुश्रीफ म्हणाले, अशी ठिणगी वगैरे काही नाही. हे सर्व ठराव झाल्यानंतर सर्व परिस्थिती मुख्यमंत्र्यांकडे सांगू आणि तेच याबाबतचा निर्णय घेतील.

□ आमदार सतेज पाटील यांनी गोकुळ निवडणुकीमध्ये राजर्षी शाहू समविचारी शेतकरी आघाडी स्थापन केली आहे. याबद्दल विचारले असता श्री. मुश्रीफ म्हणाले, त्यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे आणि आम्ही महायुतीने काय करावे, हा आमचा प्रश्न आहे. गोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढायची, जिंकायची आणि चेअरमन महायुतीचाच करायचा हे ठरलेलं आहे.

□ आमदार सतेज पाटील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या कामाला लागलेले आहेत. महायुतीचे जागावाटप कसे असेल? या प्रश्नावर श्री. मुश्रीफ म्हणाले, यांना एवढ्या जागा- त्यांना तेवढ्या जागा असं आजघडीला तरी जागावाटप होणार नाही. गोकुळ दूध संघाच्या सभासदांची कच्ची यादी व पक्की यादी तयार करणे, असा हा कार्यक्रम आहे. याचा अर्थ संस्थांकडे ठराव जाणे आणि संस्थांनी व्यक्ती प्रतिनिधी अधिकृत करणे. त्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे कच्ची यादी व पक्की यादी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक लागेल. साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये ही निवडणूक लागेल असा अंदाज आहे.

□ गोकुळची ही निवडणूक महायुती म्हणूनच लढणार हे मी सातत्याने जाहीर केले आहे. आमदार सतेज पाटील म्हणाले की, मंत्री श्री. मुश्रीफ यांनी बारा हजारवेळा महायुती, महायुती असा गजर केलेला आहे. दरम्यान; या निवडणुकीचा पहिला टप्पा आहे की आपापले लोक हे चांगल्या पद्धतीने कसे ठराव करतील आणि त्यानंतरचा जो निवडणुकीचा टप्पा आहे तो अजून पुढे आहे. मतदार यादी होणार नाही तोपर्यंत जागावाटप होणार नाही. मतदार यादी झाल्यानंतरचाच तो कार्यक्रम असतो. त्यामुळे त्यावर आत्ताच बोलणं अतिघाईचे होईल.

□ ज्यांनी निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला त्यांना ही चपराक बसली, असं समजायचं का? या प्रश्नावर श्री. मुश्रीफ म्हणाले, चपराक बसली असे म्हणता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले आहेत की, निवडणूक वेळेवर घ्या. त्यामुळेच ही निवडणूक वेळेवर होत आहे.

□ राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयामध्ये उद्भवलेल्या अधिष्ठाता व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या केबिनच्या वादासंदर्भात श्री. मुश्रीफ म्हणाले, सीपीआरच्या नूतनीकरण कामाचे लोकार्पण लवकरच मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांच्या हस्ते होणार आहे. तोपर्यंत सर्वच अधिकाऱ्यांनी शांत राहावे. याआधी येथे जिल्हा शल्य चिकित्सक बसत होते, हे खरे आहे. परंतु; स्वर्गीय कै. दिग्वीजय खानविलकरसाहेब यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू केल्यानंतर ही सर्व चल व अचल मालमत्ता शासनाने वैद्यकीय शिक्षण विभागाकडे वर्ग केली आहे. यावर मी आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर बसून तोडगा काढू. तोपर्यंत अधिकाऱ्यांनी घाई गडबड करू नये.

□ राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री नामदार श्रीमती सुनेत्रावहिनी पवार आज दिल्लीला गेले आहेत. या विषयावर विचारले असता मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे हे शिष्टमंडळ दोन विषय घेऊन दिल्लीला गेलेले आहे. कांदा स्वस्त झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. साखर कारखानदारी इतकी अडचणीत आलेली आहे की आपल्याला एक साखर कारखानदार म्हणाला की, “साखर कारखानदारीमध्ये इतक्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत की, आपण सर्व साखर कारखानदार मिळून आता सामूहिक आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे”, असे म्हणाला.

या बैठकीत साखरेचे दर वाढविणे, इथेनॉलचे दर वाढवून ईथेनॉल उचलणे, को-जनचे दर वाढविणे, रिस्ट्रक्चर करणे, सॉफ्ट लोन देणे आणि व्याजाचा भार केंद्र सरकारने उचलणे आदी साखर कारखानदारी समोरील अडचणींवर चर्चा होऊन केंद्र सरकार त्यातून मार्ग काढून देईल, असा विश्वास आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!