AISSMS इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पुणे यांनी भारत पर्यावरण कार्यक्रम – भारत
सस्टेनेबिलिटी कॅम्पस मिशन २०२६ मध्ये, Research Heights Foundation आणि Environment
Protection Training & Research Institute (EPTRI) यांच्या संयुक्त विद्यमाने, पृथ्वी दिनानिमित्त
सक्रिय सहभाग नोंदविला.
पृथ्वी सप्ताह दरम्यान संस्थेत ग्रीन कॅम्पस अॅक्शन, सस्टेनेबिलिटी जनजागृती, समुदाय संपर्क
उपक्रम, कचरा व्यवस्थापन मोहीम आणि सस्टेनेबिलिटी शपथ अशा विविध उपक्रमांचे आयोजन
करण्यात आले.
हा उपक्रम ‘विकसित भारत’च्या दृष्टीकोनाशी सुसंगत असून संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास
उद्दिष्टांना (SDGs) पूरक आहे. संस्थेची पर्यावरणपूरक आणि शाश्वततेप्रती बांधिलकी यामुळे
अधोरेखित होते.
हा कार्यक्रम श्री मालोजी राजे छत्रपती, मानद सचिव, एआयएसएसएमएस, पुणे यांच्या प्रेरणेने
आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम प्राचार्य डॉ. पी. बी. माने तसेच प्रथम वर्ष विभागप्रमुख
डॉ. एम. पी. गाजरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे
समन्वयक श्री. विक्रम देशमुख आणि डॉ. निधी शर्मा यांनी केले.
पर्यावरण विषयक ‘भारत सस्टेनेबिलिटी कॅम्पस मिशन २०२६’ हा कार्यक्रम AISSMS IOIT येथे
यशस्वीरीत्या संपन्न झाला.




