पुणे पदवीधर मतदार संघातील पुरवणी
मतदार नोंदणीत कोल्हापूर पिछाडीवर
कोल्हापूर, दि.०६ : पुणे पदवीधर पुरवणी मतदार यादीकरीता दि.३१ मे २०२६ अखेर फक्त
४९५ पात्र पदवीधरांनी आपली मतदार नोंदणी केली असून, इतर जिल्हांची पुरवणी
यादीतील मतदार संख्या पुणे-३७४९, सातारा-१८३७, सोलापूर-१४१०, सांगली-६१० अशी
आहे. या निवडणूकीची मुख्य मतदार यादी दि.१२ जानेवारी २०२६ रोजी प्रसिध्द करण्यात
आली असून, मुख्य यादीतील जिल्हावार मतदार संख्या कोल्हापूर – ९१४००, सांगली –
७८३६६, पुणे – ६१११३, सातारा – ४२०६३ व सोलापूर – ३७९५७ अशी आहे.
विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघात नोव्हें.२०२६ च्या सुरूवातीस निवडणूक
होत असून, निवडणूकीचा अधिकृत कार्यक्रम ऑक्टों.२०२६ मध्ये जाहीर होईल. निवडणूक
कार्यक्रम जाहीर होईपर्यंत पुरवणी मतदार यादीत पात्र पदवीधरांना आपली मतदार नोंदणी
करता येणार आहे. पदवीधर मतदार नोंदणीतील कोल्हापूरचे प्रथम स्थान कायम
राखण्यासाठी कोल्हापूरातील पात्र पदवीधरांनी मोठ्या संख्येने पदवीधर मतदार नोंवणी
करावी, असे आवाहन ‘पदवीधर मित्र’चे अध्यक्ष माणिक पाटील-चुयेकर यांनी एका प्रसिध्दी
पत्रकाद्वारे केले आहे.



