Spread the news

मा. नाम. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन
हार-तुरे पेक्षा समाजसेवेला प्राधान्य देण्याचे आवाहन

­

 

  •  

कोल्हापूर, दि. ०९ जून : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते मा. नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, कोल्हापूरच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज भाजपा जिल्हा कार्यालयात खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, माजी प्रदेश सचिव महेश जाधव यांच्या उपस्थिती मध्ये भाजपा पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली.
समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी आणि गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी मा.चंद्रकांतदादा पाटील त्यांच्या वाढदिवसा निमित्य अनेक सेवाभावी उपक्रम सातत्याने राबवितात. शिक्षणासाठी होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, खेळाडूंना क्रीडा साहित्य व स्पर्धांसाठी सहाय्य, गरजू रुग्णांना उपचारासाठी मदत, वैद्यकीय उपकरण बँक, मोफत फिरता दवाखाना, फिरते ग्रंथालय, सीपीआर रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी भोजन व्यवस्था, दैनंदिन गरजेच्या वस्तूंवर सवलत, महिलांसाठी मोफत शिवणकला प्रशिक्षण, दिव्यांगांना आवश्यक उपकरणांचे वाटप, अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम तसेच बालकांसाठी खेळघर यांसारख्या अनेक उपक्रमांमधून हजारो नागरिकांना आधार मिळाला आहे.
याही वर्षी मा.चंद्रकांतदादांचा वाढदिवस साजरा करताना हार, पुष्पगुच्छ, फ्लेक्स, होर्डिंग, पेढे किंवा मिठाई यांवरील खर्च टाळून ती रक्कम संवेदना सोशल फौंडेशनला देऊन समाजोपयोगी कार्याला हातभार लागणार आहे. याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी, कोल्हापूरच्या वतीने दि. १० व ११ जून रोजी आरोग्य तपासणी शिबिर, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, फुटबॉल स्पर्धा तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मा.नाम.चंद्रकांतदादा पाटील हे गुरुवार, दि. ११ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत भाजपा जिल्हा कार्यालय, नागाळा पार्क, कोल्हापूर येथे शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
समाजसेवेच्या या कार्यात योगदान देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी आपली यथाशक्ती मदत खालील खात्यावर जमा करावी :
SANVEDANA SOCIAL FOUNDATION
Bank of Maharashtra, Tararani Vidyapeeth Branch, Kolhapur
A/C No. : 60342249315
IFSC : MAHB0001219
समाजहितासाठी कार्यरत असलेल्या या सेवाभावी उपक्रमांना नागरिकांनी उदंड प्रतिसाद द्यावा, असे आवाहन भाजपा कोल्हापूर जिल्हा कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
कृपया प्रसिद्धीसाठी, आपला
मा.संपादकसो, शंतनू मोहिते
दै. भाजपा कार्यालय प्रमुख


Spread the news

You may also like

error: Content is protected !!