उद्योग-व्यापार क्षेत्राच्या सीजीएसटी व कस्टम्स विषयांवर मुख्य आयुक्त नीरज कन्सल यांच्याशी सविस्तर चर्चा*”

Spread the news

 

­

 

  •  

📰 ” *उद्योग-व्यापार क्षेत्राच्या सीजीएसटी व कस्टम्स विषयांवर मुख्य आयुक्त नीरज कन्सल यांच्याशी सविस्तर चर्चा*”
———————————–
कोल्हापूर येथील नव्या सीजीएसटी कार्यालयात पुणे झोनचे मुख्य आयुक्त नीरज कन्सल यांच्या उपस्थितीत उद्योग व व्यापार क्षेत्रातील जीएसटी व कस्टम्स संदर्भातील समस्या, सूचना आणि अपेक्षांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी कोल्हापूर फर्स्ट चे चेअरमन सुरेन्द्र जैन यांच्या हस्ते मा. कन्सल यांचा कोल्हापूरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवाचे दर्शन घडविणारी विशेष स्मृतिचिन्ह स्वरूपातील आकर्षक फोटो फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या फ्रेममागील संकल्पना आणि कोल्हापूरच्या अस्मितेशी असलेले नाते याविषयी माहिती देण्यात आली.

आपल्या मनोगतात सुरेन्द्र जैन यांनी कोल्हापूर फर्स्ट ही संस्था कोल्हापूरच्या दीर्घकालीन विकासासाठी विविध विषयांवर अजेंडा आधारित कार्य करत असल्याचे सांगितले.

यावेळी सचिन शिरगावकर, कुशल सामाणी, आदित्य बेडेकर, वीरेंद्र पाटील, अजित कोठारी, विज्ञान मुंडे यांच्यासह विविध औद्योगिक व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी जीएसटी रिफंड, अपील प्रक्रिया, ई-वे चलन, जीएसटी कॉम्प्लायन्स आणि तांत्रिक अडचणींबाबत मांडणी केली.

यावेळी मुख्य आयुक्त नीरज कन्सल यांनी महत्त्वपूर्ण घोषणा करत सांगितले की, जीएसटी अपील प्रकरणांच्या सुनावणीसाठी पुण्यातील वरिष्ठ अधिकारी महिन्यातून एकदा कोल्हापूरला भेट देणार आहेत. तसेच भविष्यातील इन्कम टॅक्स प्रमाणे जीएसटी अपिलेट सुद्धा फेसलेस करण्याबद्दल सकारात्मक आहे. त्यामुळे व्यापारी व उद्योजकांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे.

कमी जोखीम श्रेणीतील करदात्यांचे रिफंड अधिक वेगाने मंजूर करण्यासाठी निर्देश देण्यात आले असून, पोचपावतीच्या दिवशीच ९० टक्के तात्पुरता रिफंड मंजूर करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच उच्च जोखीम श्रेणीत चुकीने समाविष्ट झालेल्या करदात्यांच्या प्रकरणांनाही प्राधान्याने हाताळले जाणार आहे.

उद्योजक व व्यापाऱ्यांच्या मागण्या जीएसटी कौन्सिलपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कस्टम्स विभागात आधुनिक ‘कस्टम्स इंटिग्रेटेड सिस्टम’ (CIS) विकसित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी सुमित कुमार यादव (आयुक्त, सीजीएसटी, कोल्हापूर), प्रसाद डी. गोरसे (अपर आयुक्त), सबरीश जी. (अपर आयुक्त), रोहित जोशी (संयुक्त आयुक्त), भूपेंद्रसिंह पॉल (सहाय्यक आयुक्त) उपस्थित होते.

तसेच कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, आय एफ कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष सतीश कडुकर, हॉटेल मालक संघाचे सचिन शानबाग, ट्रॅव्हल्स असोसिएशनचे बळीराम वराडे, सीए गिरीश कुलकर्णी आणि विविध औद्योगिक व व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

उद्योग, प्रशासन आणि संघटनांमधील समन्वयातून कोल्हापूरच्या विकासाला नवी दिशा देण्याचा हा सकारात्मक प्रयत्न ठरला.
———————————–


Spread the news

You may also like

error: Content is protected !!