ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चार हजार पाचशे रुपये प्रति टन एफ. आर. पी. मिळावी व प्रति किलो 20 रुपयाची एम. एस. पी. त वाढ साखर कारखानदारांना मिळावी यासह अन्य मागण्यासाठी पदवीधर मित्र माणिक पाटील चुयेकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा तिसऱ्या दिवशी प्रादेशिक साखर-उपसंचालक युसुफ शेख यांनी भेट दिली यावेळी आंदोलनातील मागण्या विषयी माणिक पाटील यांच्याशी चर्चा केली.
प्रमुख मागण्याविषयी साखर उपसंचालक यांनी सविस्तर माहिती घेतली व ती माहिती शासनाला कळविण्याचे आश्वासन दिले. जिल्हा प्रशासनाच्या मार्फत करवीर तहसीलदार यांच्या आदेशाने त्यांनी आंदोलन स्थळी भेट दिली.
आज आंदोलन स्थळी भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष शिवसेना प्राध्यापक जालंदर पाटील, भोगावती साखर कारखान्याचे संचालक केरबा भाऊ पाटील, कार्यकारी संचालक सागर पाटील, माजी संचालक डी. आय. पाटील, बाळासाहेब पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास साहेकर यांच्यासह परिसरातील संस्थांचे पदाधिकारी शेतकरी यांनी भेटी दिल्या.




