कंत्राटदार फेडरेशनची स्थापना अध्यक्षपदी कोल्हापूरचे बापू लाड

Spread the news

कंत्राटदार फेडरेशनची स्थापना

­

 

अध्यक्षपदी कोल्हापूरचे बापू लाड

  •  

मुंबई येथे दिनांक 30 जून मंगळवार रोजी महाराष्ट्रातील सर्व ठेकेदार संघटना मिळून संघटनेतील पदाधिकारी मुंबई येथील आझाद मैदान पत्रकार भवन येथे, 25 जिल्ह्यातून 100 पदाधिकारी एकत्र जमले होते. यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फेडरेशन स्थापन करणे फेडरेशन स्थापन करणे बाबत दिनांक 14 जून 2026 कोल्हापुरे ते राज्यातील सर्व कंत्राटदारांच्या अधिवेशन मध्ये एक मताने असा निर्णय झाला होता की कॉन्ट्रॅक्टर अनेक संघटनाच्या मार्फत एकत्र रहात नाहीत, त्याच्या वेगवेगळ्या खात्यातून काम करणे म्हणजेच सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, जलसंधारण, जलसंपदा, महानगरपालिका, तसेच विद्युत मंडळाचे कॉन्ट्रॅक्टर, इतर महामंडळातील कॉन्ट्रॅक्टर, असे वेगवेगळे गट पडतात. म्हणूनच एक राज्यस्तरीय फेडरेशन स्थापन करून त्या फेडरेशन मार्फत संचालक मंडळ तयार करून त्या संचालक मंडळातर्फे कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचवने व त्याला न्याय मिळवून देणे हेच कॉन्ट्रॅक्टरच्या फेडरेशनचे उद्देश आहे. याकरिता मुंबई येथे बैठक पार पाडली या बैठकीमध्ये कोल्हापूरचे श्रीनिवास लाड उर्फ बापू यांना एक मताने अध्यक्ष निवडण्यात आले. अशा रीतीने या फेडरेशनचे कार्य चालू झालेले आहे. यावेळी बोलताना अनेक संघटनाच्या अधिकाऱ्याने विविध विषयावर आपले मांडणी केली. प्रमुख्याने राज्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर लोकांच्यावर खूप मोठ्या अन्याय होत आहे, त्याचे गेले तीन ते चार वर्षापासून ते थकीत आहेत. कधीही त्याला शंभर टक्के निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. हे असेच राहिले तर अनेक छोट्या-मोठ्या कंत्राटदारांचे मोडलेले आर्थिक नियोजन सरळ होणार नाही या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढणार आहे. असे उदाहरण देता अनेक छोटे ठेकेदार कर्ज काढून शिक्षण घेतलेल्या आहे डिप्लोमा ग्रज्युएट असे शिक्षण घेतलेले आहे. त्यानंतर कुठेही नोकरी मिळत नाही, म्हणून सुशिक्षित बेरोजगार म्हणून नोंदणी करून, थोडीफार कामे हातात घेतलेली आहेत. गेले तीन वर्षे ह्या ठेकेदारांना त्यांच्या देयकापोटी मिळणारी रक्कम पाच टक्के किंवा दहा टक्के अपेक्षा जास्त मिळालेली नाहीये. असे असताना काही अधिकारी व मंत्रालयात , ठराविक ठेकेदारांना दिले कशी निघतात हा प्रश्न पडत आहे. शासनाचा कशावरही नियंत्रण नाही असे दिसून येत आहे. गरज नसताना मोठी कामे काढून ठेकेदारांना आर्थिक अडचणी टाकलेले आहे. तसेच जे मोठ मोठे प्रोजेक्ट हातात घेतात त्याला दहा हजार वीस हजार पंधरा हजार अशा कोटीच्या निधी उपलब्ध करून दिला जातो. त्याचप्रमाणे कुंभमेळा व अनेक अशा ठिकाणी निधी उपलब्ध केला जातो. जर कंत्राटदारच राहिला नाही तर लोक झालेला निधी कसा खर्च करायचा म्हणून बाहेरच्या राज्यातून कंत्राटदार मागवून त्यांच्याकडून कामे केली जातात. हा महाराष्ट्रातील कंत्राट दारावर मोठा अन्याय नाही आहे का. आणि इकडे मोठमोठ्याने असे सांगितले जाते महाराष्ट्र आर्थिक दृष्ट्या आघाडीवर आहे. अरे बाबा ह्या राज्यात अनेक नागरिक अडचणीत असताना कसे राज्य आर्थिक आघाडीवर असणार. आज ह्या कॉन्ट्रॅक्टर व्यवसायात महिलाही आघाडीवर आहेत. त्यांनी सुद्धा आपले लग्नातले सोने नाणे कर्ज काढून कॉन्ट्रॅक्टर म्हणून नोंदणी करून कामे केलेले आहेत, त्यांच्यावरही अन्याय होत आहे. हे सर्व पाहता शासनाने बाकी सर्व विकासाची कामे ताबडतोब थांबवून या अडचणीत असलेल्या त्याची देयके देऊन आर्थिकअडचणी तून बाहेर काढणे गरजेचे आहे. या कार्यक्रमासाठी, चंद्रपूर जयंत मामितीवर नागपूरहून नितीन साळवे, कौशिक देशमुख, सुबोध सर्वोदय संजय मंद, यवतमाळ मधून प्रवीण उंबरकर , तसेच गडचिरोली अमरावती अकोला अकरा जिल्ह्यातून कॉन्ट्रॅक्टरांचे प्रतिनिधी हजर होते, मराठवाड्यामधून नांदेड श्री हकीम साहेब, जोशी साहेब जालना , संभाजीनगर , नासिक किसन पानसरे, पुण्याहून मेदगे साहेब रवी कुमार भोसले व, कोल्हापूर मधून निलेश पाटील आर आर पाटील बी एस पाटील , प्रदीप पाटील विजय सावंत किशोर जामदार, हे कार्यकर्ते उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!