पै .गौरव पाटील भविष्यात कोल्हापूरला महाराष्ट्र केसरी ,हिंदकेसरी किताब मिळवून देईल = पै .संभाजी वरुटे

Spread the news

पै .गौरव पाटील भविष्यात कोल्हापूरला महाराष्ट्र केसरी ,हिंदकेसरी किताब मिळवून देईल = पै .संभाजी वरुटे
——————————–
कोल्हापूर – पै .गौरव गुंडाजी पाटील हा किशोर मल्ल कोल्हापूरचे भविष्य आहे भावी काळात तो निश्चितच कोल्हापूरला महाराष्ट्र केसरी ,हिंदकेसरी पदक निश्चितपणे मिळवून देईल असा ठाम विश्वास मास्को विजेते पैलवान संभाजी पाटील यांनी व्यक्त केला
मोतीबाग तालीम साई कुस्ती केंद्रात सराव करणाऱ्या १५ वर्षीय पै .गौरव पाटील थायलँड येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताचे नेतृत्व करून ७५ किलो वजन गटात भारताला ग्रीको रोमन कुस्ती प्रकारात नुकतेच रोप्य पदक मिळवून दिले त्याबद्दल कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ वमोतीबाग तालमीच्या वतीने पै गौरव पाटील याचा तालीम संघाचे कार्याध्यक्ष मास्को विजेते पै. संभाजी वरुटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
याप्रसंगी तालीम संघाचे सरचिटणीस अशोक पोवार ,महाराष्ट्र केसरी वस्ताद विष्णू जोशीलकर पै संभाजी पाटील प्रशिक्षक चंद्रकांत चव्हाण प्रा. सिकंदर कांबळे यांची अभिनंदन पर भाषणे झाली या समारंभास प्रदीप गायकवाड हिंदकेसरी विनोद चौगुले कुस्ती प्रशिक्षक महेश वरुटे विजय पाटील अजयसिंह प्रकाश खोत दादू चौगुले ( ज्युनि )आदींसह कुस्तीगीर व मल्ल मोठ्या संख्येने उपस्थित होते
——————————–
मा .संपादक सो दैनिक—-
यांना
वरील वृत्त आपल्या लोकप्रिय दैनिकात छायाचित्रासह प्रसिद्ध करून सहकार्य करावे ही विनंती
प्रकाश खोत उपाध्यक्ष
अशोक पोवार सरचिटणीस
०कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ कोल्हापूर
दि८/७/२०२६

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!