*कागल अधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे तथा बाळ महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन*
कागलः
कागल संस्थानचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे तथा बाळ महाराज यांच्या जयंतीनिमित्त बस स्थानकासमोरील पुतळ्यास राजे विरेंद्रसिंह घाटगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .तर शाहू साखर कारखाना प्रधान कार्यालयातील त्यांच्या प्रतिमेस संचालक रमेश माळी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
बस स्थानक येथे ‘शाहू ग्रुपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी तर कारखाना कार्यस्थळावर संचालक सतिश पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कागलःयेथे कागल संस्थानाचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे तथा बाळ महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनवेळी राजे विरेंद्रसिंह घाटगे व इतर मान्यवर.




