Spread the news

कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी इथ सव्वाशे वर्षापुर्वीच श्री मुनीसुव्रत स्वामी जैन श्वेतांबर मंदिर आहे. या मंदीर ट्रस्टच्या वतीन चातुर्मास मंगल प्रवेश सोहळ्याचं आयोजन केलं होतं.परमपूज्य आचार्य भगवान श्री चंद्रभूषणसूरिश्वरजी महाराज साहेब यांचं अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला.

­

 

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी व्यापारी व्यावसायिक कृतीच्या मारवाडी समाजाला कोल्हापुरात पाचारण केलं त्यांच्यासाठी पद्मा चौकात जैन श्वेतांबर मंदिराची उभारणी केली. त्या घटनेला सव्वाशे वर्षे उलटून गेली. या मंदिरात दररोज पूजाअर्चा पार पडते. तसंच विविध धार्मिक विधी वर्षभर सुरू असतात. परमपूज्य आचार्य भगवान श्री चंद्रभूषणसूरिश्वरजी महाराज साहेब यांच रविवारी सकाळी साडेसात वाजता या मंदिरात आगमन होणार होतं. कोल्हापूरातील बिंदू चौकात समाजातील श्रावक श्रविकांनी भव्य स्वागत केलं. त्यानंतर बिंदू चौक इथून भव्य शोभा यात्रेला प्रारंभ झाला. आकर्षक रथ, चित्ररथ, पारंपरिक वाद्यवृंद, महिला मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग तसच युवक मंडळाचा जल्लोष यामुळ संपूर्ण परिसर भक्तिरसान भारावून गेलं होतं. महाराजांच्या जयघोषाच्या गजरात शोभा यात्रा मार्गस्थ झाली. श्रावक श्रविकांनी आचार्य भगवंतांच दर्शन घेतल. या निमित्तानं मंदिर परिसराची आकर्षक सजावट करण्यात आली होती. आत्मानंद जैन ग्रुपन महाराज साहेबांचं स्वागत आणि शोभा यात्रा यशस्वीरीत्या पार पाडली. शोभायात्रेचा समारोप ट्रस्टच्या आराधना भवनात झाला. यावेळी परमपूज्य आचार्य भगवंतांचे मांगलिक प्रवचन संपन्न झाल. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष कांतिलाल संघवी, बिपीन परमार, अभय गांधी, माजी नगरसेवक ईश्वर परमार, योगेश कांगटाणी यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा, इचलकरंजी, निपाणी, वाई, मुंबई, पुणे, अहमदाबाद इथले श्रावक श्रविका या मंगल सोहळ्यास उपस्थित होते.

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!