डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे रिसर्च डायरेक्टर* *डॉ. प्रमोद एस. पाटील यांना ‘सीआरएस लीडरशिप अवॉर्ड’

Spread the news

*डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे रिसर्च डायरेक्टर*
*डॉ. प्रमोद एस. पाटील यांना ‘सीआरएस लीडरशिप अवॉर्ड’*

­

 

कोल्हापूर
कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे रिसर्च डायरेक्टर प्रा. डॉ प्रमोद एस. पाटील यांना उत्कृष्ट संशोधन व शैक्षणिक कार्यासाठी ‘सीआरएस लीडरशिप अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. पद्मश्री डॉ. अनिल काकोडकर यांच्याहस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
चिरंतन रसायन संस्था (सीएसआर) आणि सौराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सौराष्ट्र विद्यापीठात आयोजित ‘सायन्स बियॉन्ड बाउंडरी : इन्व्हेन्शन, डिस्कव्हरी, इनोव्हेशन अँड सोसायटी’ (रसायन-२३) या आंतरराष्ट्रीय परिषदेत हा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. पाटील यांना ‘डिस्टिंग्विश्ड स्पीकर’ म्हणूनही गौरवण्यात आले.

  •  

या परिषदेत भारतासह विविध देशांतील नामवंत संशोधक, प्राध्यापक, वैज्ञानिक आणि उद्योगतज्ज्ञ सहभागी झाले होते. रासायनिक विज्ञानातील संशोधन, नवोपक्रम, शोध आणि त्याचा समाजाशी असलेला संबंध या विषयांवर परिषदेत सखोल चर्चा झाली. डॉ. प्रमोद एस. पाटील यांनी रासायनिक विज्ञान क्षेत्रातील संशोधन व नवोपक्रमावर व्याख्यान दिले.

डॉ. पाटील यांनी असाधारण शैक्षणिक कामगिरी, शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी प्रशासकीय योगदान, नेतृत्व कौशल्य आणि रासायनिक विज्ञानातील नवकल्पना स्वीकारून संशोधनाला दिलेल्या चालनेचा विशेष गौरव करताना ‘सीआरएस लीडरशिप अवॉर्ड’, सुवर्णपदक आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

या पुरस्काराबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले.

राजकोट: डॉ. प्रमोद पाटील यांना सन्मानित करताना डॉ. अनिल काकोडकर.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!