राष्ट्रीय जनगणना, शिक्षण व सवलतींवर लिंगायत समाजाची महत्त्वपूर्ण बैठक उद्या
मिरज : राष्ट्रीय लिंगायत संघ, भारत यांच्या वतीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील लिंगायत समाजातील प्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक बुधवार, दि. १७ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता मिरज येथील सेवासदन हॉस्पिटल हॉलमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष शरण प्रदीप (बापू) वाले यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या बैठकीत राष्ट्रीय जनगणना २०२६-२७, शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक सवलती तसेच समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील लिंगायत समाजातील पदाधिकारी, विविध संस्था प्रतिनिधी, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि समाजबांधवांनी या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या बैठकीचे निमंत्रक म्हणून सेवासदन हॉस्पिटलचे मुख्य संचालक डॉ. रविकांत पाटील व शरण प्रदीप (बापू) वाले कार्यरत असून समाजाच्या भावी दिशा व धोरणांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेतले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.





