केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न

Spread the news

केंद्रीय गृहमंत्री मा. ना. अमितजी शहा साहेबांचा कोल्हापूर दौरा अभूतपूर्व आणि भव्यदिव्यपणे यशस्वी करण्यासाठी महायुती सज्ज!
केंद्रीय गृहमंत्री मा. ना. अमितजी शहा साहेबांचा आगामी १९ व २० जून रोजी होणारा कोल्हापूर आणि इचलकरंजी दौरा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक करण्यासाठी महायुतीमधील सर्वच घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (केडीसीसी) सभागृहात उत्साहात पार पडली. या बैठकीला उपस्थित राहिलो.
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत अमितजी शहा साहेबांचे १९ आणि २० जून रोजी कोल्हापुरात जंगी स्वागत करण्याचा एकमुखी निर्धार केला. कोल्हापूरच्या पोलीस परेड ग्राउंडवरील ‘कृतज्ञता मेळावा’ आणि इचलकरंजी येथील जाहीर सभा या दोन्ही ठिकाणी नागरिकांची व कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी जमवून ही सभा ऐतिहासिक करण्यासाठी सर्वच पक्षांच्या वतीने विशेष सूक्ष्म नियोजन केले जात आहे. कोल्हापूरच्या विकासासाठी आणि अंबाबाई मंदिर विकास आराखड्यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या निधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महायुतीचा प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता या दौऱ्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरला असून, हा दौरा भव्य दिव्यपणे यशस्वी करण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला.
यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. हसन मुश्रीफ साहेब, पालकमंत्री मा. प्रकाश आबिटकर साहेब, खासदार मा. धैर्यशील माने, आमदार मा. चंद्रदीप नरके, माजी खासदार मा. संजय मंडलिक, माजी आमदार डॉ. सुचित मिणचेकर, उपमहापौर मा. अक्षय जरग यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the news

You may also like

error: Content is protected !!