लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त जत येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते, लोकमतचे संपादक श्री.संजय आवटे यांच्या व्याख्यानाबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन.

Spread the news

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त जत येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते, लोकमतचे संपादक श्री.संजय आवटे यांच्या व्याख्यानाबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन.

­

 

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त शनिवार दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी जत अथनी मार्गांवरील शोभा मंगल कार्यालयात सायंकाळी ५ वाजता दैनिक लोकमतचे संपादक, सुप्रसिद्ध लेखक, वक्ते श्री. संजय आवटेसाहेब यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून या प्रसंगी विविध क्षेत्रात लौकिक मिळविलेल्या व्यक्तींना मान्यवरांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

  •  

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आ. श्री. जयंतराव पाटीलसाहेब हे आहेत.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सांगली जिल्ह्याचे खासदार श्री. विशालदादा पाटील, महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी व सहकार मंत्री तथा पलूस, कडेगावचे आ. श्री. विश्वजित कदमसाहेब, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक व माजी मंत्री श्री. महादेव जानकरसाहेब, तनिष्का फॉउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक, अध्यक्ष श्री. अनिल भीमराव जाहीर हे प्रमुख पाहुणे राहाणार आहेत.

या व्याख्यान व पुरस्कार सोहळ्याला माजी आ. श्री. विलासराव जगताप, माजी आ. श्री. विक्रमसिंह सावंत, माजी सभापती श्री. सुरेशराव शिंदेसरकार, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री. सुजय (नाना) शिंदे, साध्य फॉउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या संस्थापिका, अध्यक्षा ऍड. विद्याताई मोटे,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री. प्रकाश जमदाडे, श्री. मन्सूरचाच्या खतीब, नगरसेवक श्री. मोहन कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जिल्हा सरचिटणीस, जि. प. माजी सभापती श्री. तम्मनगौडा रविपाटील, श्री. अमोल डफळे, सहाय्यक निबंधक सहकार संस्था जत, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्री. महादेव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस श. प. पक्ष जिल्हाध्यक्ष श्री. विवेक कोकरे, नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी, जतचे उपविभागीय अधिकारी श्री. अजयकुमार नष्टे, तहसीलदार श्री. प्रवीण धानोरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक श्री. विजय घेरडे आदिसह मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष तीप्पेहळळीचे माजी सरपंच श्री.प्रतापराव तात्यासाहेब शिंदे हे आहेत.

या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन डेमाक्रॉटिक
पार्टी ऑफ इंडिया चे संस्थापक अध्यक्ष प्रा.श्री.सुकुमार कांबळे, जिल्हाउपाध्यक्ष श्री. अविनाश वाघमारे विशाल कांबळे, संजय कांबळे, ऍड. युवराज निकम, अतुल कांबळे, आर. पी. आय. प्रदेश कार्याध्यक्ष संजय कांबळे, नगरसेवक संतोष कांबळे, बाजी केंगार, प्रकाश देवकुळे, दीपक शिंदे, आकाश बनसोडे, प्रशांत ऐदाळे, विजयराजे चव्हाण, राहुल वाघमारे, आदींनी केले आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!