Spread the news

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रणधुमाळीस सुरुवात, भा. ज. प. आमदार व मुख्यमंत्री ना. देवाभाऊंचे लाडके गोपीचंद पडळकर यांनी निवडूकीत लक्ष घातल्याने महाविकास आघाडीकडून एकास एक उमेदवार उभ्या करण्याच्या हालचाली.

­

 

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचा बिगुल वाजला असून आज प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यावर हरकती नोंदविल्या जाणार असून त्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होणार आहे.

  •  

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उभ्या राहणाऱ्या उमेदवाराला मोठया प्रमाणात खर्च करावा लागणार असून विद्यमान संचालकांनी ही निवडणूक न लढविण्याची भूमिका घेतली आहे.

यातच राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे लाडके आ. श्री.गोपीचंद पडळकर यांनी या निवडणुकीत उडी घेतल्याने विरोधकांत धडकी भरली असून या निवडणुकीत आमदार स्वतः उभे राहाणार असल्याने तालुक्यातील अनेक संस्थानी आपले उखळ पांढरे केलेची जोरदार चर्चा आहे.

सांगली कृषी उत्पन्न बाजारसमितीचे माजी सभापती श्री. सुजय उर्फ नाना शिंदे यांनी तर विरोधक तगडा उमेदवार उभा करीत असल्याने महाविकास आघाडीकडून एकास एकच उमेदवार देण्यासंदर्भात आघाडीत चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले. तर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री. सुरेशराव शिंदेसरकार यांनीही आपण या निवडणुकीसाठी इच्छुक नसल्याचे सांगत आ. श्री. गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी पुर्ण ताकत उभी करणार असल्याचे सांगितले.

आ. पडळकर यांच्यासाठी कुणीकोनूर सर्वसेवा सोसाईटीचा ठराव झाला असलातरी सनमडी येथून जिल्हापरिषद सदस्य सुनील पवार यांचे बंधू सराफ संघटनेचे राष्ट्रीय नेतृत्व श्री. विनोद पवार व निगडीखुर्द सोसायटीचे श्री. काकासाहेब काशीद यांना या निवडणुकीत आ. पडळकर यांनी संधी द्यावी व मराठा समाजाला न्याय दयावा अशी मागणी ही या भागातून होत आहे.

एकंदरीत जिल्हा बँकेची ही निवडणूक यावेळी अत्यंत चूरसीची व प्रतिष्ट्येची होणार यात शंका नाही.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!