Spread the news

*डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये*
*शनिवारी सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन*

­

 

कोल्हापूर
डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता सायबर गुन्ह्यांबाबत विद्यार्थी व नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, कोल्हापूरच्या अस्थिरोग विभागाच्यावतीने शनिवार दि. २२ ऑगस्ट रोजी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

  •  

शनिवारी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत कदमवाडी येथील डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या सभागृहात हे व्याख्यान होणार आहे. वतीने ‘सायबर स्मार्ट : स्टे सेफ इन डिजिटल वर्ल्ड’ या विषयावर कोल्हापूर सायबर सुरक्षा पोलीस विभागाचे अजय सावंत या वेळी मार्गदर्शन करणार आहेत.

मोबाईल, इंटरनेट, ऑनलाइन आर्थिक व्यवहार आणि सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची खबरदारी, सायबर फसवणुकीचे प्रकार आणि त्यापासून बचावाच्या उपाययोजनांबाबत याबाबत माहिती देण्यात येईल. ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी, बनावट लिंक व संदेशांपासून सावध राहण्याचे उपाय, ओटीपी व वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचे महत्त्व, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर तसेच सायबर फसवणूक झाल्यास तातडीने कोणती पावले उचलावीत, याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत.

सायबर गुन्ह्यांपासून स्वतःसह कुटुंबीयांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक डिजिटल साक्षरता आणि सुरक्षित ऑनलाइन व्यवहारांच्या सवयी विकसित करण्याच्या दृष्टीने हे व्याख्यान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा व विभागप्रमुख डॉ. प्रदीप पाटील यांनी सांगितले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!