एक राखी सीमेवरील जवानांसाठी देश रक्षाबंधन उपक्रमा चे सलग २७ व्या वर्षी स्वामी विवेकानंद ट्रस्ट वतीने आयोजन
कोल्हापूर -जीवावर उदार होऊन लढणाऱ्या सैनिकांच्या या देश रक्षणाच्या कर्तव्याला अभिवादन करण्यासाठी तसेच त्यांचे नैतिक बळ वाढवण्यासाठी राख्या बांधणारे कमी होऊ नयेत या जनजागृतीसाठी श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर यांच्या वतीने कारगिल युद्धापासून गेली सत्तावीस वर्षापासून एक राखी सीमेवरील जवानांसाठी हा देश रक्षाबंधनाचा उपक्रम राबवला जातो. या उपक्रमांतर्गत विविध शाळा, महाविद्यालय, महिला बचत गट, महिला संस्था यांच्याकडून राख्या जमा करून त्या मराठा बटालियन (टीए) यांच्या सहकार्याने थेट सीमेवर पाठवल्या जातात .
प्रतिवर्षी एक लाखाहून अधिक राख्या या उपक्रमांतर्गत जमा होतात यावर्षी देखील प्रतिवर्षीप्रमाणे राख्या जमा करण्याचा ट्रस्टचे नियोजन आहे . यावर्षीचा जाहीर कार्यक्रम मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता महादेव मंदिर ते बटालियन टेंबलाईवाडी मंदिर गेट समोर कोल्हापूर या ठिकाणी होणार असून विविध संकलन केंद्रावर सोमवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत राख्या पाठवाव्यात असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात येत आहे .या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी अध्यक्ष किशोर घाटगे – सचिव राजेंद्र मकोटे सह संचालक महेरा कामत, महेश कामत , कमलाकर किलकिले , डॉ . सायली कचरे , नगरसेविका माधुरी किरण नकाते, अशोक लोहार सुखदेव गिरी डॉ गुरुदत्त म्हाडगुत उमेश निरकारी प्रा . दिग्वीजय कुंभार – शहीद महाविद्यालय तिटवे ,तुषार साळगांवकर राधानगरी , गिरीष गंवडी कागल सुभाष माने गारगोटी सह पदाधिकारी कार्यरत आहेत . राखी संकलनाची विविध संकलन केंद्रे खालील प्रमाणे आहेत – नागराज पेपर स्टॉल – शुक्रवार गेट, कामत झेरॉक्स — शहाजी कॉलेज व टेंबे रोड, भिवटे पोहे सेंटर — महाद्वार रोड, हॉटेल चिन चायनीज — जिल्हा परिषद परिसर, मँगो एफ एम रेडिओ –ताराबाई पार्क, भगिनी मंच – शिवालय शनिवार पेठ कोल्हापूर, देवयानी नेट कॅफे— ईगल प्राइड मिरजकर तिकटी, मैत्रीण मंच समर्थ ज्वेलर्स पंचरत्न प्लाझा गुजरी, कॉटन किंग — राजारामपुरी सातवी गल्ली, श्रीराम सलून सेंटर — रघुनाथ टिपुगड े मेन रोड राजारामपुरी पाचवी गल्ली, जय महाराष्ट्र रसवंती गृह कमलाकर किलकिले रविवार पेठ लक्ष्मीपुरी, आनंद मिल्क कॉर्नर किरण पवार — मिरजकर तिकटी पाण्याच्या हौदाजवळ, म्हाडगूत पोहे सेंटर — महाद्वार रोड कोल्हापूर, अभिजीत न्युज पेपर एजन्सी — श्री लस्सी समोर रंकाळावेश स्टॅन्ड, एएस पाठक ज्वेलर्स – — हॉटेल ओशो शेजारी बिन खांबी गणेश मंदिर रोड, राधानगरी – तुषार साळगावकर विजय बकरे पेपर स्टॉल, साई फोटो स्टुडिओ— नंद ू गुरव पत्रकार मेन रोड राधानगरी, गारगोटी पत्रकार सविता सुभाष मान े भुदरगड टाइम्स, बांबवडे रत्न श्याम ज्वेलर्स नामदेव गिरी बाजारपेठ बांबवडे तालुका शाहुवाडी, कागल गिरीश गवंडी– कोल्हापूर लेदर चप्पल निर्मिती केंद्र कागल पंचायत समिती परिसर कागल.



