विद्यार्थ्यांची मेहनत व शिस्त हीच यशाची गुरुकिल्ली :* *संस्थापक भरत रसाळे यांचे प्रतिपादन*

Spread the news

*विद्यार्थ्यांची मेहनत व शिस्त हीच यशाची गुरुकिल्ली :*
*संस्थापक भरत रसाळे यांचे प्रतिपादन*
*कोल्हापूर*
*21व्या शतकात शिक्षण हीच राष्ट्रीय संपत्ती असून विद्यार्थ्यांची मेहनत आणि शिस्त हीच यशाची गुरुकिल्ली आहे. असे प्रतिपादन खाजगी शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचे संस्थापक भरत रसाळे यांनी केले.ते खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्यावतीने आयोजित शिष्यवृती सराव परीक्षेत गुणवत्ता प्राप्तविद्यार्थी सन्मान सोहळ्यात बोलत होते.*
*पतसंस्थेच्या वतीने प्रत्येक वर्षीप्रमाणे इ . चौथी व सातवी साठी मोफत शिष्यवृती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते . या परीक्षेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून १८०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या इयत्ता चौथीच्या ११ व इयत्ता सातवीच्या ६ विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संस्थेच्या सभागृहात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक भरत रसाळे होते*
*यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, बक्षीस रक्कम व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.*
*सराव परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य केलेले केंद्र संचालक गोरख वातकर, सागर पाटील, संतोष केसरकर, महादेव डावरे, सर्जेराव नाईक यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी पतसंस्थेच्या सभासद मंगल पाटील यांच्या कन्या अक्षया पाटील यांची पुरवठा अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल तसेच अनघा सूर्यकांत पाटील यांची कनिष्ठ लेखापाल जिल्हा कोषागार कार्यालय धाराशिव येथे निवड झाल्याबद्दल त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.*
*कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना संस्थापक भरत रसाळे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी सातत्य, मेहनत व शिस्त यांच्या जोरावर मोठे यश संपादन करावे, असे मार्गदर्शन केले. तसेच अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरणा मिळते, असेही त्यांनी नमूद केले.*
*चेअरमन साताप्पा कासार यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांचे कौतुक करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. केंद्र संचालक गोरख वातकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या यशामागील परिश्रमांची दखल घेतली.*
*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी सोनाळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन मच्छिंद्र नाळे यांनी केले.*
*यावेळी संचालक सर्वस्वी राजेश कोंडेकर, सल्लागार समिती सदस्य आप्पासाहेब वागरे, कार्यकारी संचालक सदाशिव साळवी व सर्व स्टाफ,विद्यार्थी, पालक, यशस्वी विद्यार्थ्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक व इतर मान्यवर उपस्थित होते.*

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!