आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते प्रयोगशाळा सहाय्यक, परिचर उद्बोधन कार्यशाळेचे उद्घाटन

Spread the news

आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते प्रयोगशाळा सहाय्यक, परिचर उद्बोधन कार्यशाळेचे उद्घाटन
आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते बुधवारी जिल्हास्तरीय प्रयोगशाळा सहाय्यक, परिचर उद्बोधन कार्यशाळेचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड होते.
माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ जिल्हा कोल्हापूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यशाळेस शुभेच्छा देऊन आमदार जयंत आसगावकर म्हणाले, शासन विविध कारणे देत मराठी शाळा बंद पाडण्याचा घाट घालत आहे. आता शिक्षकांबरोबर प्रयोगशाळा सहाय्यक व परिचारक यांचे पगार थांबवण्याचे पाप या शासनाने केला आहे. संघर्ष केल्याशिवाय आपल्या पदरात काहीच पडणार नाही. यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. आपल्या संघटनेच्या मागण्या संदर्भात मंत्री महोदयांना वेळोवेळी पत्र दिलेली आहेत; परंतु सहा महिने झाले तरी मंत्री महोदयांकडून बैठकीसाठी वेळ मिळालेली नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. शिक्षक आमदार म्हणून तुमचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी माझे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, त्यात मी कुठेही कमी पडणार नाही. येत्या पावसाळी अधिवेशनात तुमचे प्रश्न मांडून तुम्हाला न्याय देऊ, अशी ग्वाही आमदार जयंत आसगावकर यांनी दिली.
कार्यक्रमाला शिक्षण उपसंचालक बालाजी यरमुनवाड, उपशिक्षणाधिकारी रवींद्र चौगुले, वेतन पथक अधीक्षक उदय सरनाईक, प्रा. विकास पाटील, कोजिमाशीचे संचालक श्रीकांत कदम, प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष जगदीश शिर्के, सचिव अशोक आरेकर, कार्याध्यक्ष संतोष देसाई यांच्यासह प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर उपस्थित होते.

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!