Spread the news

ती बांधकामे अनाधिकृतच

­

 

उचगाव- गांधीनगर मधील व्यापाऱ्यांचे दाबे धणाणले

  •  

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

कोल्हापूर

उचगाव आणि गांधीनगर हद्दीतच बांधकामे आहेत, म्हणून सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतलेल्या व्यापाऱ्यांचे आणि उद्योजकांचे धाबे दणाणले आहेत. कारण साडेतीनशे पेक्षा अधिक बांधकामे ही कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतच असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. दरम्यान ही बांधकामे अनाधिकृत असल्याने त्याच्यावर आता महापालिका कारवाई करण्याची शक्यता आहे.

उचगाव आणि गांधीनगर भागातील काही रि.स. नंबरच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकाम करण्यात आली. यावर महापालिकेने कारवाई करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा संबंधित बांधकामदारांनी प्रथम जिल्हा न्यायालयात धाव घेतली. पण जिल्हा न्यायालयाने ही बांधकामे अनाधिकृत ठरवली. त्यानंतर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण पोहोचले. जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा यामध्ये अहवाल देण्याचा आदेश न्यायालय दिला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर हे बांधकामे कोल्हापूर शहराच्या हद्दीतच असल्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामध्ये अनेक मोठे व्यापारी असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!