जत तालुक्यातील डफळापूर येथे नरवीर उमाजी नाईक यांच्या डिजिटल पोस्टर विटंबनेवरून दोन समाजात वाद उफाळून मोठा उद्रेक, परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पोलीस गाड्यांची तोडफोड.
जत तालुक्यातील डफळापूर या गावात चॊकात नरवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त येथील रामोशी समाजाच्यावतीने डिजिटल लावून नरवीर उमाजी नाईक यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली होती.
त्यानंतर येथील दुसऱ्या समाजाच्या लोकांनी चॊकातील चबुतरा दुरुस्थिसाठी या चबुताऱ्याजवळील नरवीर उमाजी नाईक यांचे डिजिटल पोस्टर काढल्यावरून वाद होऊन मोठा संघर्ष पेटला आहे.
हा दोनी समाजातील वाद एवढा विकोपाला गेला असून डफळापूर गावात एकमेकांच्यावर दगडफेकीचे प्रकार घडून पोलिसांची गाडी फोडल्याचीही चर्चा आहे.त्यासाठी जिल्हापोलीस प्रमुख श्री. तुषार दोषी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.
गावात तणावाचे वातावरण असून मोठया पोलीस कुमकेची गरज पडणार आहे.



