भाजपचे नेते डॉ. के. एस. चौगुले (आण्णा ) यांची पुणे पदवीधर मतदारसंघातून माघार भाजपा
उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांना मिळणार बळ….
प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या सूचनेनुसार डॉ. के एस चौगुले अण्णा यांनी पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतून माघार घेतली. भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉ. स्मिता जाधव तसेच शिक्षक मतदार संघाचे अधिकृत उमेदवार कौस्तुभ गावडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रचार यंत्रणा राबविणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.सदर बैठकीस भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



