आ. संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा नोंदवून अटक करत आमदारकीचा राजीनामा घ्या अन्यथा राज्यव्यापी आंदोलन:गिरीश फोंडे यांचा इशारा

Spread the news

आ. संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा नोंदवून अटक करत आमदारकीचा राजीनामा घ्या अन्यथा राज्यव्यापी आंदोलन:गिरीश फोंडे यांचा इशारा

­

 

शिवसेना पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी बुधवार दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी रात्री 12 वाजून 52 मिनिटांनी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे माजी राज्य सेक्रेटरी प्रशांत आंबी यांना गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या संदर्भात फोनवरून जीवे मारण्याची धमकी देत अत्यंत अश्लील व आक्षेपार्ह भाषेत शिवीगाळ केली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून लोकशाही मूल्यांना व अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बाधा आणणारी आहे. आमदार संजय गायकवाड यांनी भूतकाळामध्ये अशीच गुन्हेगारी स्वरूपाची कृत्ये केली आहेत. एकूणच त्यांचे वर्तन हे आमदार म्हणून अशोकनीय व महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला कलंक लावणारे आहेत.
‘छत्रपती शिवाजी महाराज हे तुझ्या आईचा नवरा होते काय’ असे वक्तव्य करून त्यांनी महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे.

  •  

“शिवाजी कोण होता?” हे पुस्तक इतिहासाचा चिकित्सक व अभ्यासपूर्ण दृष्टिकोन मांडणारे असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचे विवेकी व पुरोगामी विश्लेषण करते. समाजात वैज्ञानिक दृष्टी, समता आणि ऐतिहासिक सत्य जाणून घेण्याची प्रेरणा देणारे हे महत्त्वपूर्ण लेखन आहे. तसेच या अगोदर 1926 रोजी प्रबोधनकार ठाकरे यांनी असेच चिकित्सक पुस्तक दगलबाज शिवाजी या नावाने लिहिले. त्याचबरोबर गणेश कुऱ्हाडे या लेखकांनी 1939 रोजी “शिवाजी कोण होता?” हे पुस्तक लिहिले होते.
जेव्हा खऱ्या अर्थाने प्रशांत कोरटकर, गोविंद गिरी, राहुल सोलापूरकर, भगतसिंग कोश्यारी हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात तेव्हा संजय गायकवाड सारखे लोक हे हेतू पुरस्कार मूग गिळून गप बसलेले असतात.
तथापि, आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाच्या प्रचार-प्रसारावरून प्रशांत आंबी यांना धमकावणे, शिवीगाळ करणे, तसेच जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करणे, महापुरुषांचा अपमान करणे व महिलांविषयी अश्लील आणि आक्षेपार्ह भाषा वापरणे, हे अत्यंत निंदनीय व कायद्याच्या विरोधात आहे.

म्हणून पुढील मागण्या करत आहोत

1) आमदार संजय गायकवाड यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा.
2) त्यांच्यावर जीवे मारण्याची धमकी, जातींमध्ये तेढ निर्माण करणे, महापुरुषांचा अपमान करणे व महिलांविषयी अश्लील वक्तव्य करणे या गंभीर गुन्ह्यांखाली तात्काळ गुन्हा नोंदवून अटक करण्यात यावी.
3) गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणाच्या तपासामध्ये आमदार संजय गायकवाड यांची सखोल चौकशी करण्यात यावी.

लोकशाही व्यवस्थेत विचार मांडण्याचे स्वातंत्र्य अबाधित राखणे ही शासनाची जबाबदारी आहे. अशा प्रकारच्या धमक्या व बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्हाला किसान सभा वतीने व पुरोगामी संघटनावतीने राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी.

गिरीश फोंडे
राज्य सचिव
महाराष्ट्र राज्य किसान सभा
8830223485


Spread the news

You may also like

error: Content is protected !!