जतचे विकासपुत्र आमदार श्री. गोपीचंद पडळकर व नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी यांनी देवभूमी जत करण्यापूर्वी जत बसस्थानक नरकपुरीतून बाजूला काढावे.
जतचे विकासपुत्र आमदार श्री. गोपीचंद पडळकर यांनी प्राचीन नगरी असलेल्या जतचे नाव देवभूमी जत करण्याचा निर्धार केला आहे. परंतु या देवभूमी जतमध्ये बाहेरील राज्यातून तसेच महाराष्ट्रातून जे प्रवासी लोक जतच्या बस स्थानकात असलेल्या शॉचालयात पाय ठेवतात तेंव्हा आपण देवभूमी जतमध्ये नसून नरकभूमी जतमध्ये असल्याचे प्रत्येक्षात अनुभवयाला मिळते.
कारण बसस्थानकातील शॉचालयात असलेली दरवाजे, संडासची भांडी, शौचालयातील अस्वच्छता, मोठी दुर्गंधी यामुळे या ठिकाणी जाणाऱ्यांना नरक काय असतो याची या देवभूमीतच जाणीव होते.
जत बसस्थानकातील ह्या नरकपुरीला जबाबदार असणाऱ्या संबंधितांचा स्पेशल क्लास आमदार श्री. गोपीचंद पडळकर व जतचे नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी यांनी घ्यावा अशी अपेक्षा जतकरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.



