सीमेवरील जवानांसाठी करवीरकर भगिनीने पाठवलेली एका राखी देते बारा हत्तीचे नैतिक बळ — ऑननरी लेफ्टनंट कर्नल संतोष सकुंडे

Spread the news

सीमेवरील जवानांसाठी करवीरकर भगिनीने पाठवलेली एका राखी देते बारा हत्तीचे नैतिक बळ — ऑननरी लेफ्टनंट कर्नल संतोष सकुंडे
छत्रपती ताराराणी यांच्या नावे सैनिकी स्कूल व मुलींसाठी लष्करी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न करणार —महापौर रूपाराणी निकम
श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कारगिल युद्धापासून गेली सत्तावीस वर्षे एक राखी सीमेवरील जवानांसाठी एक राखी हा देश रक्षाबंधनाचा उपक्रम घेतला जातो यावर्षी या उपक्रमांतर्गत दोन लाखहून अधिक जमलेल्या राख्या प्रदान कार्यक्रम महादेव मंदिर मराठा बटालियन टी ए च्या प्रांगणात संपन्न झाला कार्यक्रमच्या सुरुवातीला कर्मवीर इंग्लिश मीडियम स्कूल, छत्रपती शाहू हायस्कूल, चाटे स्कूल, तक्षशिला इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली प्रास्ताविकात अध्यक्ष किशोर घाटगे यांनी संस्थेच्या कार्याचे माहिती दिली व आज जमा झालेल्या दोन लाखाहून अधिक राख्या ही त्याच कार्याची पोचपावती आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही तसेच गेले दहा वर्षापासून छत्रपती ताराराणीच्या नावाने ट्रस्टच्या वतीने सैनिकी स्कूल ची व मुलींसाठी लष्करी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची मागणी केली. त्याला त्वरित प्रतिसाद देत महापौर रूप राणी निकम यांनी छत्रपती तारा रायांचे हेतरी शताब्दी वर्ष चालू असून या कालखंडात व माझ्या महापौराच्या कारकिर्दीत श्री स्वामी विवेकानंद चरटेबल ट्रस्टने केलेली मागणी ही पूर्ण करण्यासाठी जातीने प्रयत्न करणार असे सांगितले मुली व महिलांनी इतर क्षेत्राबरोबरच लष्करी परंपरेच्या या क्षेत्रात देखील चांगली कामगिरी व नावलौकिक केलेला आहे देश रक्षणात देखील महिला कुठेच मागे नाहीत हे ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने सिद्ध झालेले आहे आणि करवीरच्या मुली संरक्षण क्षेत्रात धडाडीने पुढे याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी ऑनररी लेफ्टनंट कर्नल संतोष सकुंडे यांनी करवीर भगिनींनी पाठवलेल्या या राख्या मुळे सीमेवर देशाचे रक्षण करत असताना जवानांना 12 हत्तीचे नैतिक बळ मिळते तसेच गेल्या अनेक वर्षे सुरू असलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे कोल्हापूरला मोठी लष्करी परंपरा असून यामध्ये आता महिला देखील आपला ठसा उमटवत आहेत असे मत व्यक्त केले. यावेळी एन एन पाटील सांगावडेकर यांनी देखील मनोगत व्यक्त केले यावेळी निवृत्त कर्नल विजयसीह गायकवाड, ऑनररी लेफ्टनंट शामराव साळवी, ऑनररी लेफ्टनंट राजेश सावंत, यावेळी नगरसेविका प्राथमिक शिक्षण मंडळ सभापती शीला सोनुले माजी महापौर नगरसेविका माधवी गवंडी नगरसेविका दीपा काटकर नगरसेविका माधुरी किरण नकाते नगरसेविका रेखा उगवे, नीलिमा पाटील नगरसेविका अर्चना पागर नगरसेविका वंदना मोहिते यासंह शालेय विद्यार्थिनी व महिलांनी भावपूर्ण वातावरणात उपस्थित जवानांना राख्या बांधल्या. हा कार्यक्रम यशस्वतीसाठी अध्यक्ष किशोर घाटगे सचिव राजेंद्र मकोटे यासह कमलाकर किलकीले महेश कामत डॉक्टर सायली कचरे सौ.यशश्री घाटगे अशोक लोहार सीमा मकोटे, प्रशांत बरगे या सह कार्यकर्ते कार्यरत होते

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!