गोकुळच्या विकासासाठी एकजुटीने पुढे जाऊया!

Spread the news

गोकुळच्या विकासासाठी एकजुटीने पुढे जाऊया!

­

 

आज गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार मा. श्री. सतेज पाटील साहेब यांच्या समवेत शिरोळ तालुका प्रचारदौरा करण्यात आला.

  •  

गोकुळ हा केवळ दूध संघ नसून कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मजबूत आधारस्तंभ आहे. हजारो दूध उत्पादक शेतकरी, पशुपालक आणि त्यांच्या कुटुंबांच्या जीवनाशी गोकुळची नाळ जोडलेली आहे. त्यामुळे गोकुळची प्रगती म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांच्या जीवनमानाची प्रगती.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना अधिक सक्षम करणे, त्यांना योग्य मोबदला मिळवून देणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, दूध संकलन व प्रक्रिया व्यवस्था अधिक सक्षम करणे आणि गोकुळला भविष्यात आणखी मजबूत बनविण्यासाठी मा. सतेज पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखालील निर्माण होणाऱ्या पॅनलला विजयी करून गोकुळच्या विकासाच्या या प्रवासात ठामपणे साथ देऊया!

गोकुळची ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे आणि गोकुळचे भविष्यही शेतकऱ्यांच्या प्रगतीत आहे.

कोल्हापूरच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उंची देऊया!

आजच्या दौऱ्यात माजी आमदार राजू आवळे, गोकुळचे संचालक रणजित पाटील, दत्तचे चेअरमन रघुनाथ पाटील, संचालक दरगू गावडे, शेखर पाटील, प्रमोद पाटील, अमर यादव, विजय सूर्यवंशी, अशोक कोळेकर, जि. प. सदस्या अर्चना चौगुले, शिरोळचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव, नगरसेवक गुंडाप्पा पवार, सुदर्शन कदम, नितीन बागे, धनाजी पाटील, अमोल चौगुले, शितल उपाध्ये, जयदीप थोरात यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

📍 स्थळ : शिरोळ

गणपतराव पाटील
प्रमुख, श्री दत्त उद्योग समूह


Spread the news

You may also like

error: Content is protected !!