समाजमन संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद: विकलांग राजूला मदतीचा हात

Spread the news

घरी वृद्ध आई, दहा बाय दहाचे घर, घरी कमावता कोणी नाही…, अशा परिस्थितीत मंगळवार पेठेतील प्रॅक्टीस क्लब येथे राजू जगताप हा आपल्या आईसह दिनवाण्या आणि केविलवाण्या परिस्थितीत राहतोय. कोल्हापुरातील दैनिक महासत्तामध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करणाऱ्या २०२३ साली राजूचा एक अपघात झाला. या अपघातात तो विकलांग झाला. अजूनही तो विकलांग अवस्थेत असून जवळपास अंथरुणाला खिळूनच आहे. सध्या तो आणि त्याची आई दोघेजण कसेबसे गुजराण करताहेत. त्यांच्या घरचीही आर्थिक परिस्थिती बेताची असून त्याला आर्थिक मदतीसह फेजिओथेरपीची गरज असून यासाठी दानशुरांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन कोल्हापुरातील समाजमन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार महेश गावडे यांनी केले होते. त्याला शुक्रवारी सकारात्मक प्रतिसाद लाभला.
अरिहंत जैन फौंडेशनचे जयेश ओसवाल, उद्योगपती सिकंदर भाई देसाई यांनी राजू जगतापला मदतीचा हात दिला. त्यांनी दिलेले जीवनावश्यक वस्तुंचे किट पत्रकार राजेंद्र मकोटे आणि सामाजिक कार्यकर्ते नवाब शेख यांच्यामार्फत राजू जगतापची भेट घेवून त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
राजू याचे वडील गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून बेपत्ता आहेत. तो त्याच्या आईसह मंगळवार पेठ येथे राहतो. त्याला उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. किंवा तो साधन नाही. आतापर्यंत दानशूरांकडून मिळालेल्या आर्थिक आणि वैद्यकीय मदतीवर तो जीवन कंठत आहे. विकलांग राजूवर नियमित फिजिओथेरपी होणे गरजेचे आहे. यासह त्याचा चरितार्थ कसा चालेल हेही पाहणे गरजेचे आहे. मात्र, यासाठी पुन्हा समाजातील दानशूर उद्योगपती, पुढारी यांनीच पुढे येणं आता गरजेचं बनलेले आहे, असे समाजमन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेश गावडे यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून यापूर्वी पत्रकार गुरुबाळ माळी, विजय पोवार यांनी मदत केली होती. दरम्यान, या आवाहनाला शुक्रवारी सकारात्मक प्रतिसाद लाभला. सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकार नवाब शेख यांना ही गोष्ट समजल्यावर त्यांनी अरिहंत जैन फौंडेशनचे जयेश ओसवाल, उद्योगपती सिकंदर भाई देसाई यांच्या कानावर ही घटना घातली. त्यानंतर सिकंदर देसाई यांच्या कन्या अष्का आणि जयेश भाई ओसवाल यांनी पुढाकार घेवून राजू जगतापसाठी जीवनावश्यक साहित्य, वस्तूंचे किट नवाब शेख यांच्या भवानी मंडपातील दुकानात पोहोच केले. दरम्यान, पत्रकार राजेंद्र मकोटे यांच्या मदतीने राजू जगतापचे घर शोधून अष्का सिकंदर देसाई आणि जयेश ओसवाल यांनी दिलेले किट राजू जगताप व त्याची आई यांची भेट घेवून त्यांच्याकडे सुपूर्द केले. या सत्कार्यात पत्रकार नवाब शेख यांचे रिक्षाचालक मित्र माणिक गायकवाड यांनी भाडेही घेतले नाही. तर त्यांचे भवानी मंडपात खेळणी विकणारे मित्र मिथिलेश कुमार यानी स्वतःच्या खांद्यावर हे ओझे घेवून राजूच्या घरात हे किट पोहोच केले. दरम्यान, मिळालेल्या मदतीमुळे राजूसह त्याच्या आईने कृतज्ञता समाधान व्यक्त केली.
– समाजमन सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार : महेश गंगाराम गावडे
अधिक माहिती व मदतीसाठी संपर्क साधावा: ९८२३७६७८५८

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!