पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे यांना टीडीएफची पुरस्कृत उमेदवारी

Spread the news

प्रतिनिधी  : पुणे विभाग शिक्षक मतदार संघ विधानपरिषद निवडणूक 2026 येत्या नोव्हेंबर / डिसेंबर महिन्यात होणार आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीने ( टीडीएफ)  पुण्यामध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. संघटनेशी असलेली बांधीलकी, शिक्षकांच्या प्रश्नांची जाणीव, मतदार संघात असलेला संपर्क तसेच निवडून येण्याची क्षमता या सर्व गोष्टींचा विचार करून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  कौस्तुभ गावडे यांच्यावर विश्वास दाखवून या मतदारसंघासाठी टीडीएफच्या वतीने  त्यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. पुणे येथे पत्रकार परिषदेमध्ये प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना टीडीएफचे राज्य अध्यक्ष जी.के. थोरात, राज्याचे कार्यवाह के.एस.ढोमसे, तसेच पुणे विभागाचे अध्यक्ष शिवाजी कामथे यांनी केली आहे. यावेळी  पुणे विभाग माध्यमिकचे प्रवक्ते प्रा.शशिकांत शिंदे,पुणे विभागाचे प्रसिद्धीप्रमुख प्रा. संतोष थोरात, राज्य कार्यकारणी सदस्य,निवड समिती सदस्य तसेच टीडीएफचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावडे हे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असून पुणे  विभागातील शिक्षकांच्या  प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी नेहमीच आवाज उठवला  आहे, तसेच स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मोठे पाठबळ त्यांच्या पाठीशी असल्याने विजयाची खात्री त्यांनी व्यक्त केली आहे. टीडीएफचे माजी आमदार सुरेश पाटील, गजेंद्र ऐनापुरे यानंतर तिसऱ्यांदा टीडीएफच्या वतीने  पुणे  विभागाचे नेतृत्व करण्याची संधी  गावडे यांच्या रूपाने मिळत आहे.
यावेळी टीडीएफच्या अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी पाचही जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी व शिक्षकांनी उभे राहून प्रचंड बहुमताने टीडीएफचा उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करावे असे आवाहन राज्याचे अध्यक्ष थोरात यांनी केले आहे.

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!