सुट्टीच्या कालावधीमध्ये महालक्ष्मी अन्नछत्र येथे सुमारे दोन लाख भक्तांनी घेतला मोफत भोजनाचा लाभ .
उन्हाळा सुट्टीच्या निमित्ताने कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी भक्तांनी अलोट गर्दी केली .देशभरातून भाविकअंबाबाईच्या दर्शनासाठी आलेले होते .याच कालावधीमध्ये महालक्ष्मी अन्नछत्र येथेभाविकांनी मोठा प्रतिसाद दिला अक्षरशः रांगा लावून भक्तांनी या मोफत भोजन प्रसादाचा लाभ घेतला सुमारे दोन लाख भक्तांनी अन्नछत्राचा लाभ घेतला यासाठी दोन तास अन्नछत्राची वेळ वाढवण्यात आली होती .मसाले भात आमटी मिक्स भाजी गव्हाची खीर ताक आधी पदार्थ ठेवण्यात आले होते .यासाठी अध्यक्ष राजू मेवेकरी यांचे मार्गदर्शनाखाली ७५ कर्मचारी सहसंजय जोशी राजेश सुगंधी एस के कुलकर्णी . विराज कुलकर्णी अँड तन्मय मेवेकरी सतीश सरनाईक सुनील खडके चंद्रशेखर घोरपडे आदित्य मेवेकरी अतिश । जाधव ऋतुराज सरनोबत प्रथमेश कुलकर्णी प्रतीक गुरव रजत जोशी यांनी संयोजन केलेअत्यंत शिस्तबद्ध नेटके नियोजन यामुळे भक्तांनी समाधान व्यक्त केले .कपिल तीर्थ व्यापारी वर्गानी विषेश सहकार्य केले .
.






