महासत्ता चौक ते ज्ञानेश्वर मंदिर रस्त्याच्या डांबरीकरण पॅचवर्क चे काम आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या सूचनेनुसार चालू
—————————————-
इचलकरंजी : अनेक दिवस प्रलंबित असलेले महासत्ता चौक ते ज्ञानेश्वर मंदिर रस्त्याच्या डांबरीकरण पॅचवर्क चे काम आमदार डॉ.राहुल आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि, महापौर उदय धातुंडे साहेब , स्थायी समिती सभापती सतीश मुळीक साहेब, यांच्या सूचनेनुसार महासत्ता चौक ते ज्ञानेश्वर मंदिर या रस्त्याचे डांबरी पॅचवर्क करण्याचे काम सुरू करण्यात आले असून त्यासाठी विमानतळ सल्लागार समिती सदस्य मधुकर मुसळे (बापू), श्रेणीक मगदूम, राहुल गाट,यांनी सातत्याच्या पाठपुरावा केला होता अखेर या कामाला यश आले.
महासत्ता चौक ते ज्ञानेश्वर मंदिर, आमराई रोड हा रस्ता पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी खुदाई केला होता. त्यामुळे या रस्त्याची दुरावस्था झाली होती.
मधुकर मुसळे (बापू ), श्रेनिक मगदूम, राहुल गाट यांनी या कामासाठी सातत्याने आमदार, महापौर, स्थायी समिती सभापती, व संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता त्यामुळे आमदार राहुल आवाडे यांनी कामाचे महत्त्व लक्षात घेऊन संबंधितांना सूचना दिल्या.
सदर रस्त्याचे डांबरी पॅचवर्क करण्याचे काम चालू करून ते काम पूर्णत्वास येत आहे.
महापौर उदय धातुंडे, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांनीही यात लक्ष घातले. मधुकर मुसळे (बापू), श्रेणिक मगदूम, राहुल घाट यांनी सातत्याने पाठपुरा केल्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम चालू झाल्यामुळे महासत्ता चौकापासून आमराई रोडवरील टाकवडे, शिरढोण कडे जाणारे, आमराई रोड परिसर, शिक्षक कॉलनी, कामाक्षी रेसिडेन्सी, ज्ञानेश्वर कॉलनी, पवार मळा,या परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
गतीने काम केल्याबद्दल आमदार डॉ. राहुल आवाडे साहेब यांचा सत्कार मधुकर मुसळे, राहुल गाट, श्रेनिक मगदूम यांनी पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील उपस्थित होते.




