Spread the news

CTET परीक्षेसाठी कोल्हापुरात केंद्र द्यावे ; भरत रसाळे यांची केंद्रीय शिक्षण बोर्डाकडे मागणी
कोल्हापूर :सप्टेंबर 2026 मध्ये होणाऱ्या CTET परीक्षेसाठी कोल्हापूरमध्ये केंद्र द्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाकडे केली आहे . याबाबतचे निवेदन त्यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डांच्या CTET युनीटचे संचालक डॉ .
जितेंद्रकुमार यादव यांना दिले .
समितीचे राज्यध्यक्ष भरत रसाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,केंद्राची CTET परीक्षा सप्टेंबर 2026 मध्ये घेण्यात येत आहेत .या परीक्षेसाठी महाराष्ट्र मध्ये मुंबई , नाशिक ,अमरावती , नागपूर अशा ठिकणीच परीक्षा केंद्रे दिलेली आहेत .पश्चिम महाराष्ट्रासाठी या परीक्षेसाठी एकही केंद्र नाही . त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासाठी म्हणून कोल्हापूर हे केंद्र देण्यात यावे . त्यामुळे सोलापूर ,सातारा ‘ सांगली ,कोल्हापूर ,रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील परीक्षार्थींची मोठी सोय होणार आहे .सन 2025 मधील CTET परीक्षेसाठी मुंबई येथेच केंद्र होते .एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील चाळीस हजार शिक्षक व परीक्षार्थी या परीक्षेसाठी मुंबईला गेले होते . या सर्वांची निवास व्यवस्था न झालेने व एवढ्या लांब अंतरावर जाऊन परीक्षा दिल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले होते .त्यामुळे येत्या सप्टेंबर 2026 मध्ये होणाऱ्या केंद्राच्या CTET परीक्षेसाठी कोल्हापुरमध्ये केंद्र द्यावे व व पश्चिम महाराष्ट्रातील परीक्षार्थांची सोय करावी .अशी मागणी CTET चे संचालक जितेंद्र कुमार यादव यांच्याकडे केली आहे . याबाबतचा मेल पाठवलेला असून त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून हे केंद्र मंजूर व्हावे यासाठी प्रयत्न चालू असल्याचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी म्हटले आहे .

­

 

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!