शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी ‘CAP प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व चर्चा सत्र

Spread the news

*शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी ‘CAP प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व चर्चा सत्र’ उत्साहात संपन्न*

­

 

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी) येथे दि. २७ जून २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता संस्थेच्या सभागृहात प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी ‘CAP प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व चर्चा सत्र’ उत्साहात संपन्न झाले. MHT-CET 2026 मध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (CAP) संदर्भातील अचूक, अद्ययावत व सविस्तर माहिती मिळावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

  •  

यावेळी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे *प्रभारी संचालक प्रा. डॉ. अजित कोळेकर* यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “योग्य माहिती आणि योग्य निर्णय यांच्या आधारे विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार, गुणवत्तेनुसार आणि करिअरच्या उद्दिष्टांनुसार महाविद्यालय व शाखेची निवड करावी. अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये देश-विदेशात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढे जावे.”

यानंतर प्रशिक्षण व *प्लेसमेंट सेल अधिकारी तथा CAP प्रवेश प्रक्रिया तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. गणेश पाटील* यांनी विद्यार्थ्यांना सुमारे दीड तास सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी CAP नोंदणी प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, गुणवत्ता यादी (Merit List), पर्याय फॉर्म (Option Form) भरण्याची योग्य पद्धत, CAP च्या विविध फेऱ्या, महाविद्यालय व शाखा निवडीचे निकष, प्रवेश निश्चिती प्रक्रिया, शुल्क, शिष्यवृत्ती योजना तसेच विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेदरम्यान घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर माहिती दिली.
यासोबतच भविष्यातील रोजगाराच्या संधी, उच्च शिक्षणाच्या संधी, विविध शिष्यवृत्ती योजना, विद्यापीठाच्या विविध विद्यार्थी कल्याणकारी योजना, सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेली फी सवलत व मोफत वसतिगृह योजना, तसेच प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे आणि प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण स्वरूप याविषयीही विद्यार्थी व पालकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन व आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!