कोल्हापूर महानगरपालिकेचे नगरसेवक विजयेंद्रसिंह माने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इनरव्हील क्लब, सहयोग मित्रपरिवार, रुईकर कॉलनी युवा मंच आणि मॉर्निंग वॉकर्स ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने रुईकर कॉलनी परिसरात वृक्षारोपण समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी उपस्थित राहून माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रुईकर कॉलनी परिसरात यावेळी देशी प्रजातीच्या रोपांचे रोपण करण्यात आले. प्रसंगी अखिलेशराजे घाटगे,नगरसेविका वंदना मोहिते,विश्वजीत मोहिते,नगरसेवक प्रमोद देसाई, राजनंदा महाडिक, तेजस्विता माने,भाग्यश्री तेंडुलकर, संजीव परिख, नितीन पाटील, अनिल हिराणी, प्रशांत घोडके, वीरेंद्र मगदूम, सुशांत टकलक्की, बिपिन जैन, योगेश पटेल, कृपेश पटेल, अनिल सारडा, दिलीप लडगे, अमित चौगुले, योगेश पाठक, इंद्रजीत चव्हाण, सुनील देशपांडे, अमोल बुढ्ढे, अमित हळवणकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते




