Spread the news

प्रतिवर्षी प्रमाणे कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा 16 ते 19 जून या कालावधीमध्ये अंबाई डिफेन्स कॉलनीतील बॅडमिंटन कोर्टवर होतील.

­

 

  •  

या स्पर्धा 9, 11, 13, 15, 17 आणि 19 वर्षांखालील मुले आणि मुली एकेरी, 13, 15, 17 वर्षांखालील मुले दुहेरी, 19 वर्षांखालील मुले आणि मुली दुहेरी, पुरुष आणि महिला एकेरी, पुरुष दुहेरी, 35 वर्षांवरील पुरुष दुहेरी अशा विविध वयोगटात खेळवण्यात येतील.

कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनतर्फे यावर्षीपासून “व्हेटरन्स डबल्स” आणि “मिक्स्ड डबल्स” पुरुष आणि महिला यांच्यासाठी विविध वयोगटानुसार स्पर्धा भरवण्यात येणार आहेत.

या स्पर्धांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी www.mbasso.in या संकेत स्थळावर संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.

अक्षय मनवाडकर
जॉईंट सेक्रेटरी
कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन, कोल्हापूर.
मोबाईल क्रमांक – 9762161844


Spread the news

You may also like

error: Content is protected !!