व्हर्बल व्हाइब्स अकॅडमीच्या ग्रँड शोकेसमध्ये विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्याचा प्रभावी आविष्कार

Spread the news

व्हर्बल व्हाइब्स अकॅडमीच्या ग्रँड शोकेसमध्ये विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्याचा प्रभावी आविष्कार

­

 

कोल्हापूर, २८ जून: व्हर्बल व्हाइब्स अकॅडमीतर्फे ग्रँड शोकेस २०२६ चे आयोजन नागाळा पार्क येथील रोटरी समाज सेवा केंद्र येथे उत्साहात पार पडले. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासपूर्ण संवादकौशल्य आणि वक्तृत्वाचा प्रभावी आविष्कार सादर केला.

  •  

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नालंदा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनचे संचालक श्री. श्रीपाद पाटील उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाचे कौतुक करत संवादकौशल्य हे यशस्वी आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे कौशल्य असल्याचे सांगितले. तसेच अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकास घडत असल्याचे त्यांनी नमूद केले.

अकॅडमीच्या टायनी टॉकर्स, वर्ड वंडर्स, स्पीक स्मार्ट आणि नेक्स्टजेन स्पीकर्स या विविध गटांतील विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर भाषणे, कथाकथन आणि माहितीपूर्ण सादरीकरणे केली. वरिष्ठ विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान कंपन्यांचा जागतिक अर्थव्यवस्था आणि समाजावर होणाऱ्या परिणामांवर समूहचर्चाही सादर केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हर्बल व्हाइब्स अकॅडमीच्या संस्थापिका सौ. शोभा अरविंद यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आपल्या मनोगतात त्यांनी प्रत्येक मुलामध्ये आत्मविश्वास, प्रभावी संवादकौशल्य आणि स्वतःचे विचार निर्भयपणे मांडण्याची क्षमता विकसित व्हावी या उद्देशाने अकॅडमीची स्थापना करण्यात आल्याचे सांगितले. हा कार्यक्रम स्पर्धा नसून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आणि आत्मविश्वासाचा उत्सव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. पालकांनी विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासातील सकारात्मक बदल आणि अकॅडमीच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.

कार्यक्रमाचा समारोप सौ. शोभा अरविंद यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. त्यानंतर समूह छायाचित्र आणि अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!