एक पृथ्वी एक आरोग्य या संकल्पनेवर आधारित यावर्षीचा आंतरराष्ट्रीय योग दिन सालाबाद प्रमाणे यावर्षी क्रीडाई कोल्हापूर तर्फे सिग्मा हॉस्पिटल,कावळा नाका चे प्रमुख डॉक्टर श्री.प्रदीप पाटील यांचे हॉस्पिटलमध्ये साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के पी खोत, उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, सचिव गणेश सावंत, संचालक चेतन चव्हाण, माजी सचिव उत्तम फराकटे, माजी खजिनदार विलास रेडेकर व सभासद मिळून 50 लोक हजर होते.डाॅ. विनय चौगुले व डॉ विजय कुलकर्णी यांनी योगाचे महत्त्व सांगितले . तसेच विविध योगासने, प्राणायाम व ध्यान यांचे मार्गदर्शन केले. नियमित योगा करा फिट रहा असा निरोगी जीवनशैलीचा संदेश यावेळी देण्यात आला.यावेळी यावेळी इप्का लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे सर्व उपस्थित सभासदांना मॅटची व नाश्त्याची सोय करण्यात आली होती. हा कार्यक्रम अगदी चांगल्या पद्धतीने पार पडला. शेवटी क्रिडाई कोल्हापूरचे सचिव गणेश सावंत यांनी सर्वांचे आभार मानले.





