तृतीयपंथीयांना कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये विशेष कोटा आरक्षित करणेत यावा अशी मागणी नगरसेविका जयश्री चव्हाण यांनी कोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली. अध्यक्षस्थानी महापौर रूपाराणी निकम होत्या.
पध्दतीच्या नोकऱ्या उपलब्ध कराव्यात, समानसंधी लागू करावी, तक्रार निवारणासाठी विशेष समिती नियुक्त करुन इतर सुविधा देणेबाबत’ भारतीय पौराणिक कथांमध्ये यक्ष, गंधर्व आणि कित्ररांना (तृतीयपंथी) विशेष स्थान आहे. हे सर्व अर्धदेवी प्राण आहेत. जे देव आणि मानव यांच्या त दुआ म्हणून काम करतात. हा समुदाय प्राचीन काळापासून भारताच्या विविध धार्मिक आणि सांस्कृति परंपरांचा एक भाग आहेत. तसेच काही ठिकाणी तृतीयपंथी लोकांना शुभ मानले जाते आणि शुभ कार्याच्या वेळी त्यांचे आशिर्वाद मागितले जातात.
कोल्हापूर शहर हे सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रगत विचारसरणीचा वारसा आणि परंपरा जपणारे शहर म्हणून देशभर ओळखले जाते. या परंपरेला अनुसरुन समाजातील सर्व घटकांना समान संधी देणे ही स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी आहे. तसेच सामाजिक न्यायाचा वारसा राजर्षि शाहु महाराज यांच्या रुपाने व आरक्षणाची देणगी आपल्या राजाने जगाला देऊन सर्वसमावेशक न्याय प्रत्येक वंचित घटकाला यांच्या माध्यमातून सर्व समाजाला दिला आहे.
तृतीयपंथी समाजाची आर्थिक व शैक्षणिक स्थिती अत्यंत बेताची असुन त्यांना कुटुंब व समाजाकडुन बहिष्कार, हिंसा व भेदभाव सहन करावा लागती. त्यांना नोकरीमध्ये नाकारले जाते. यामुळे मजबुरीने त्यांना भीक मागणे, जोगवा मागणे, नाच-गाणे करणे, असुरक्षित व अनौपचारिक क्षेत्रात काम करावे लागते जे त्यांच्या मानवी सन्मानाला बाधा आणणारे आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना वंचित घटकांच्या विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार आहे. देशातील काही शहरांना जसे पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे तृतीयपंथीयांना सुरक्षारक्षक, स्वच्छता, आरोग्य, प्रशासनिक व डेटा एंट्री पदावर नियुक्त केले आहे. याअनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिकेतही तृतीयपंथीयांना नोकरीमध्ये विशेष आरक्षण निश्चित करणेत यावे. प्रत्येक विभागात निश्चित पदे राखीव ठेवावीत, समानसंधी लागू करणेत यावी, तक्रार निवारणासाठी विशेष समिती नियुक्त करणेत याची, अल्प शिक्षित व्यक्तिना कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्रे सुरु करावीत यासह त्यांना विशेष सर्व सुविधा कोल्हापूर महानगरपालिके मार्फत देणेत याव्यात म्हणून आमचा सदस्य ठराव मंजुर करणेत यावा.




