“कोल्हापूर फर्स्टतर्फे कर्तृत्व सन्मान सोहळा”

Spread the news

“कोल्हापूर फर्स्टतर्फे कर्तृत्व सन्मान सोहळा”

­

 

विमानसेवा विस्तार, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदानामुळे विकासाला गती मिळेल: सत्कारमूर्तींचे मनोगत
कोल्हापूरच्या शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी कार्यरत असलेल्या ’’‘कोल्हापूर फर्स्ट’’’च्या वतीने आयोजित ’’‘कर्तृत्व सन्मान सोहळा’’’ शनिवारी (दि. 8 ऑगस्ट) रोजी पार पडला.
कोल्हापूरच्या विकासामध्ये विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्याचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला माजी राज्यपाल, शिक्षण महर्षी, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील’’ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कोल्हापूरचे नांव जागतिक स्तरावर पोचविणा-या व लौकिक वाढविणारे कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती, कोल्हापूरच्या औद्योगिक,शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे उद्योजक संजय घोडावत, दुर्मिळ,गुंतागुंतीची मेंदूवरील सलग 17 तास शस्त्रक्रिया करणारे डॉ.शिवशंकर मरज्जके यांचा सत्कार कोल्हापूर फर्स्टच्यावतीने ’’कर्तृत्व सन्मानपत्र देऊन गौरव’’ करण्यात आला. संभाजीराजे छत्रपती यांचा सत्कार बाळ पाटणकर यांनी स्वीकारला. डॉ. संजय डी पाटील यांचा सत्कार लवकरच त्यांच्या निवासस्थानी जाऊन करण्यात येणार आहे.प्रास्ताविक कोल्हापूर फर्स्टचे संचालक कमलाकांत कुलकर्णी यांनी केले.

  •  

कोल्हापूर फर्स्टचे चेअरमन सुरेन्द्र जैन यांनी सत्कार मुर्तीची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी बोलताना संजय घोडावत म्हणाले की, कोल्हापूरला देशाच्या विविध भागांशी तसेच जगाशी जोडण्याचे माझे स्वप्न आहे. जागतिक पातळीवर कोल्हापूरची विमानसेवा अग्रस्थानी असावी, हा माझा प्रयत्न आहे.बाळ पाटणकर म्हणाले की,
कोल्हापुरात क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर टॅलेंट आहे. शूटिंग, स्विमिंग यांसह विविध क्रीडा प्रकारांमध्ये कोल्हापूरच्या खेळाडूंनी पदके मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियमसाठी 32 एकर जागा मिळाले आहे. आठ एकर जागा स्टेडियमसाठी लागते उर्वरित जागेमध्ये पार्किंगसह विविध क्रीडा व गेम्सच्या अॅक्टिव्हिटींसाठी सुविधा निर्माण करता येतील.
डॉ. शिवशंकर मजरज्जके म्हणाले की,
कणेरीमठ येथे मेंदूवरील सलग सुमारे १७ तासांची गुंतागुंतीची बायपास शस्त्रक्रिया सिध्दगिरी हॉस्पीटीलच्या सहकार्याने यशस्वीपणे करण्यात आली. अशा प्रकारच्या अत्याधुनिक उपचारांसाठी अत्यंत महागडी आणि आधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्री आवश्यक असते. काही अत्याधुनिक मशीन्स आपल्या कोल्हापुरात उपलब्ध आहेत, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. कोल्हापुरात मेडिकल टुरिझमला निश्चितच मोठी संधी आहे.
या सन्मान सोहळ्यास कोल्हापूर फर्स्टशी संलग्न असणाऱ्या सर्व संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार सहसचिव जयदीप पाटील यांनी मानले. कार्यक्रम होस्ट करणारे डॉ. सचिन कुलकर्णी, डॉ. संतोष प्रभू , डॉ. विवेकानंद कुलकर्णी व जे के शाह यांचा यावेळी रोप देऊन सत्कार करण्यात आला.
कोल्हापूरचा विकास विविध क्षेत्रांतील सामूहिक प्रयत्न, सहकार्य आणि सकारात्मक दृष्टिकोनातून कोल्हापूरच्या विकासाला निश्चितच नवी दिशा व गती मिळू शकते, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कोल्हापूर फर्स्टच्या या उपक्रमाला शहर व जिल्ह्यातील विविध औद्योगिक, व्यावसायिक, सामाजिक, वैद्यकीय आणि शैक्षणिक संस्थांनी मनापासून सहकार्य केले. यामध्ये कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन, क्रीडा प्रतिष्ठान, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, कोल्हापूर हॉटेल मालक संघ, आय.टी. असोसिएशन ऑफ कोल्हापूर, आय.आय.एफ. कोल्हापूर चॅप्टर, असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनिअर्स, कोल्हापूर चार्टर्ड अकाउंटंट्स सोसायटी, कोल्हापूर चॅप्टर, इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) कोल्हापूर, टेक्स्टाईल इंजिनिअर्स असोसिएशन कोल्हापूर, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया-कोल्हापूर, जे.पी. इंडस्ट्रियल पार्क असोसिएशन, हातकणंगले, सोसायटी ऑफ एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअर्स-कोल्हापूर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल असोसिएशन, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, कोल्हापूर ऑन्कॉलॉजी असोसिएशन आणि कोल्हापूर प्रेस क्लब यांचा सहभाग होता.

विविध क्षेत्रांतील या संस्थांची एकजूट म्हणजे कोल्हापूरच्या उज्ज्वल भविष्यासाठीची सामूहिक बांधिलकी आहे. सर्वांच्या सहभागातून निर्माण झालेल्या या सकारात्मक वातावरणामुळे कोल्हापूरच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा ‘कोल्हापूर फर्स्ट’चा संकल्प अधिक दृढ झाला.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!