ह्युंदाईची ऑल न्यू एक्सटर माई ह्युंदाईत दाखल. आधुनिक फीचर्ससह ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय..

Spread the news

ह्युंदाईची ऑल न्यू एक्सटर माई ह्युंदाईत दाखल. आधुनिक फीचर्ससह ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय..

­

 

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात आघाडीवर असलेल्या ह्युंदाई मोटर इंडियाने आपल्या लोकप्रिय SUV सेगमेंटमध्ये “ऑल न्यू एक्सटर” ही आकर्षक आणि आधुनिक कार ग्राहकांसाठी सादर केली आहे. माई ह्युंदाईमध्ये कोल्हापूरचे उपमहापौर अक्षय जरग यांच्या हस्ते “ऑल न्यू एक्सटर” चे अनावरण संपन्न झाले.

  •  

ऑल न्यू एक्सटर ही कार विशेषतः शहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहकांचा विचार करून डिझाईन करण्यात आली आहे. या कारमध्ये आधुनिक सुरक्षा फीचर्स, आकर्षक इंटीरियर आणि दमदार परफॉर्मन्सचा समावेश आहे. यामध्ये सहा एअरबॅग्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम तसेच सनरूफसारखे प्रीमियम फीचर्स उपलब्ध आहेत. नवीन एक्सटरची किंमत 7 लाखांपासून 11 लाखांपर्यंत आहे.

माई ह्युंदाईचे मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे यांनी सांगितले की ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन एक्सटर ही कार बाजारात आणण्यात आली आहे. सुरक्षितता, स्टाइल आणि परवडणारी किंमत या तिन्ही बाबींचा उत्तम समतोल या गाडीत साधण्यात आला आहे. या नवीन मॉडेलमुळे एसयुव्ही सेगमेंटमध्ये स्पर्धा अधिक तीव्र होणार असून ग्राहकांसाठी एक्सटर हा एक उत्तम पर्याय ठरणार आहे. माई ह्युंदाईच्या कोल्हापूर, इचलकरंजी आणि जयसिंगपूर येथील शोरूम्समध्ये “ऑल न्यू एक्सटर” पाहण्यासाठी व टेस्ट ड्राईव्हसाठी उपलब्ध आहे. ग्राहकांनी जवळच्या शोरूला भेट देऊन आजच टेस्ट ड्राईव्ह घ्यावी आणि अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने नवीन एक्सटरचं बुकींग करावं, असं आवाहनही तेज घाटगे यांनी केलं आहे..


Spread the news

You may also like

error: Content is protected !!