लिंगायत समाजाच्या मागण्या मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे ठामपणे मांडल्या!
लिंगायत समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या व समाजाच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांबाबत लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाने आज महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेतली. यावेळी आमदार शिवाजी पाटील,श्री. संजय शंकराव तेलनाडे, श्री. प्रशांत लक्ष्मण शहापुरे, श्री. मनोजकुमार गणपती रणदिवे, श्री. संतोष आप्पासो चिक्कोडे, श्री. राजशेखर विरपक्ष तंबखे, श्री. नितीन रामगोंडा पाटील, श्री. सुरेश नरसगोंडा पाटील, श्री. शंकर रामगोंडा बिराजदार, श्री. बसवराज कणकणवाडी, श्री. नितेश कोरी,श्री. विजयकुमार खमलेट्टी व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी लिंगायत समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध मागण्यांकडे मुख्यमंत्री महोदयांचे लक्ष वेधण्यात आले. विशेषतः महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना सुलभपणे लाभ मिळावा, महामंडळाच्या योजनांमधील जाचक अटी शिथिल करण्यात याव्यात, शासनाच्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात, युवकांना शिक्षण व रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच समाजाच्या इतर प्रलंबित प्रश्नांवर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशा विविध मागण्या मुख्यमंत्री महोदयांसमोर सविस्तरपणे मांडण्यात आल्या.
लिंगायत समाजाने राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आर्थिक जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे समाजाच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने पाहून त्यावर तातडीने सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.
मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शिष्टमंडळाने मांडलेल्या सर्व मागण्या व समस्या आस्थेने ऐकून घेतल्या. समाजाच्या मागण्यांबाबत शासन स्तरावर सकारात्मक विचार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
लिंगायत समाजाच्या प्रत्येक न्याय्य मागणीसाठी आणि समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला जाईल. समाजातील युवक, महिला, शेतकरी, उद्योजक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य कुटुंबांना शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
लिंगायत समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेला हा पाठपुरावा मागण्या मार्गी लागेपर्यंत सातत्याने सुरू राहील.
समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी सदैव कटिबद्ध!
#लिंगायत_समाज #देवेंद्र_फडणवीस #लिंगायत_समाजाच्या_मागण्या #महात्मा_बसवेश्वर #महाराष्ट्र



