ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50000 ची मदत द्यावी. व्ही. बी. पाटील जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांची मागणी.

Spread the news

 

 

 

  •  

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50000 ची मदत द्यावी.

व्ही. बी. पाटील जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांची मागणी.

चालू वर्षी 10 जूनला सुरू होणारा पाऊस 15 मे पासूनच जोरदार बरसला असून अद्यापही जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उन्हाळी पिके काढणीपूर्वीच शेतात कुजून गेली. उन्हाळी व खरिपाची पिके सततच्या पावसामुळे प्रभावित झाली असून शेतकरी पूर्णपणे अडचणीत आलेला आहे, त्यांचा उत्पादन खर्चही चालू हंगामात त्यांच्या अंगावर आहे. त्यातच खतांच्या वाढलेल्या किमती, महागाई यामुळे शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा आणखीनच वाढलेला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची आवश्यकता असून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर रुपये 50,000 ची मदत शासनाने प्राधान्याने करावी अशी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील शहराध्यक्ष आर. के. पोवार कार्याध्यक्ष अनिल घाटगे, सरचिटणीस सुनील देसाई, उत्तर विधानसभा अध्यक्ष गणेश जाधव, बाजीराव खाडे, करवीर तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, सहकार सेल अध्यक्ष संजय शिंदे, अविनाश माने, गणेश नलवडे, सुरेश कुरणे, रवी कांबळे इत्यादी उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!